लातूर : दीक्षाभूमी एक्सप्रेस ही महाराष्ट्र आणि उत्तर भारताला जोडणारी महत्वाची रेल्वे आहे. अनेक दिवसापासुन ही रेल्वे लातूर मार्गे वळवावी अशी मागणी होत होती. या मागणीला रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी आखेर या रेल्वे ला लातुरमार्गे धावण्यास मंजुरी दिली आहे. यामुळे लातूरातील भाविकांची व प्रवाशांची मोठी सोय होणार आहे. येत्या शिवजंयतीपासून ही रेल्वे लातूर मार्गे धावायला सुरूवात होईल.
अनेक वर्षापासून सातारा, पुणे, अहमदनगर , औरंगाबाद, जालना, परभणी, नांदेडमार्गे धावत होती. या मार्गानुसार कोल्हापुर ते नागपुर हे अंतर ४०८ कि.मी लाबून जावे लागत होते. यामुळे प्रवासाला १२-१५ तासांचा अधिक वेळ लागत होता. यामुळे वेळ आणि पैशाचा अपव्ययही होत होता. तसेच लातूर येथून उत्तर भारतात जाण्यासाठी एकही रेल्वे नव्हती. या सर्व बाबी लक्षात घेऊन मध्य रेल्वे सोलापूर मंडळाचे सल्लागार समिती सदस्य श्यामसुदंर मानधना यांनी ही रेल्वे लातूरमार्गे वळवावी अशी मागणी केली.
तसेच औसाचे आमदार अभिमन्यू पवार यांनीही तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दिक्षाभूमी एक्सप्रेस लातूरमार्गे वळवावी अशी मागणी केली होती. देवेंद्र फडणवीस यांनी ही बाब रेल्वे मंत्री पीयुष गोयल यांना पत्राद्वारे केली होती. येत्या शिवजयंतीपासुन म्हणजे १९ फेब्रुवारी पासून ही रेल्वे लातूर पासून धावणार आहे. या रेल्वेमुळे कोल्हापूर, सोलापूर, पंढरपूर, तुळजापूर, परळी वैजनाथ, वाराणसी, बौद्ध विहार अशा अनेक तिर्थस्थळांना तसेच शहराना जाण्यासाठी सोय झाली आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘तुम्ही ७० वर्षांत काय केलं, याचा हिशोब आणलाय का’
- ‘काहीही लिहू नका, तिला स्वर्गात शांतपणे राहू द्या’, पूजाच्या बहिणीचे भावनिक आवाहन
- आंदोलनासाठी दीर्घकाळ सार्वजनिक जागेचा ताबा घेणे चुकीचे; सुप्रीम कोर्टाने आंदोलकांना सुनावले खडेबोल
- ‘शिवाजी महाराजांच्या वाटेवर चालतो, असे सांगणारे उद्धव ठाकरे पूजा चव्हाणला न्याय देणार का’?
- फेसबुक करणार निर्मिती क्षेत्रात पदार्पण स्मार्टवॉच बाजारात आणण्याची तयारी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

