Share

Jayant Patil : आजही उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असून, ते मातोश्रीवरुन काम करत आहेत – जयंत पाटील

Published On: 

मुंबई : पक्षाचे दिग्गज नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे हे आसाममधील एका हॉटेलमध्ये एकूण ४० आमदारांसह उपस्थित आहेत आणि सरकार स्थापन करण्याच्या त्यांच्या आग्रहावर ठाम आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ठाकरे यांनी एकतर भाजपसोबत सरकार बनवावे किंवा स्वत:कडे लक्ष द्यावे, असे एकनाथ शिंदे यांचे म्हणणे आहे. या पाश्वर्भूमीवर जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

शिवसेनेचे जे आमदार गुवाहाटीला गेले आहेत त्यांनी मा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा पाठिंबा काढलेला नाही किंवा शिवसेना पक्ष सोडण्याचे विधान केलेले नाही. गुवाहाटीवरुन आमदार मुंबईत आल्यानंतर ते जेव्हा शिवसेनेशी चर्चा करतील, त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपला निर्णय घेईल, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्यावर बोलत असताना ते म्हणाले की, शिवसेनेचा इतिहास आतापर्यंत असा आहे की, आधीही काहींनी पक्ष सोडला पण नंतर सार्वत्रिक निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. त्यामुळे पक्षाचे कार्यकर्ते हे आमदारांसोबत नसून पक्षासोबत असतात. हे शिवसैनिकांनी अनेकवेळा दाखवून दिले आहे. त्यामुळे शिवसेनेत आमदार किती आहेत? त्याची आज चिंता करण्याची गरज शिवसेनेला नाही. संख्याबळ आणि सरकार टिकवण्यासाठी त्यांनी एकत्रित बसून निर्णय घ्यावा, असे जयंत पाटील म्हणाले.

तसेच वर्षा बंगला सोडून मातोश्रीला जाणे हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा वैयक्तिक निर्णय होता. मात्र आजही ते मुख्यमंत्री असून ते मातोश्रीवरुन काम करत असल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!