मुंबई : दिवाळी नंतर राज्यात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाण आढळत आहेत. राज्य दुसऱ्या लाटेच्या उंबरठ्यावर असल्याची भीती खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली आहे. मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद अशा शहरांसह छोटी शहरं आणि ग्रामीण भागातही कोरोनारुग्णांचे आकडे वाढत आहेत. त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा काही निर्बंध लादण्याचा विचार महाविकास आघाडी सरकार करत आहे. तसे संकेत मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले आहे.
राज्यात कोरोनाच्या स्थितीचा आढावा घेतला जातोय. 8 दिवस अंदाज घेऊन काही निर्बंध आणता येतील का? याचा विचार सुरु आहे. शेवटी जीव वाचवणं महत्वाचं आहे, अशी प्रतिक्रिया वडेट्टीवार यांनी दिली आहे. राज्यात कोरोना रुग्णांचे आकडे वाढत आहेत. त्यामुळे खबरदारी घेणं महत्वाचं असल्याचं मत वडेट्टीवार यांनी व्यक्त केलं आहे. सर्वसामान्यांसाठी रेल्वे सुरु करण्याबाबत अजून निर्णय झालेला नाही. सर्व अभ्यास करुन निर्णय घेतले जातील, असंही त्यांनी सांगितलं.
तर दुसरीकडे पुन्हा निर्बंध लागू करणार असल्याची मोठी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. बिंदास्त राहण्याची प्रवृत्ती वाढत असल्यानं राज्यात पुन्हा निर्बंध लावणार असून निर्बंध लावण्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचीही इच्छा असल्याचं राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. ते जालन्यामध्ये पत्रकारांशी बोलत होते.
लॉकडाऊन नसला तरी शिथिल केलेले निर्बंध पुन्हा लावण्यात येणार असल्याचं राजेश टोपे यांनी सांगितलं आहे. सोशल डिस्टंसिंगचं पालन होत नसल्यानं राज्य सरकार हा कठोर निर्णय घेणार आहे. यावर पुढच्या दोन दिवसांत मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीनंतर घोषणा होणार असल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे.
सार्वजनिक ठिकाणी नागरिक सोशल डिस्टन्सिंग पाळताना दिसत नाही. मास्क वापरले जात नाहीत. त्यामुळं आपल्याला काही कडक पावलं टाकावीच लागतील. सार्वजनिक ठिकाणी गर्दी वाढत आहेत. त्यामुळं तिथे जे निर्बंध शिथिल केले होते ते पुन्हा लावावे लागतील असं राजेश टोपे म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
- ‘आश्रम मधील जपनाम वाला भुपा आणि साहेबांवर टिका करणारा (भा)जपनामवाला गोपा सारखेच’
- आता राज्यपाल सुद्धा पहाटे कोणतीच गोष्ट करत नसतील; जयंत पाटलांचा टोला
- अनोळखी नंबर ओळखण्यासाठी गूगल लवकरच आणणार नवीन अॅप
- मनसे सुपारी घेतल्याशिवाय कामच करू शकत नाही, अनिल परबांचा खळबळजनक आरोप
- नक्की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण? अजित पवार की उद्धव ठाकरे?; आंबेडकरांचा खोचक सवाल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

