🕒 1 min read
मुंबई : राज्यात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या राजीमान्यानंतर एकनाथ शिंदे आणि भाजपने राज्यात नवीन सरकार स्थापनेची तयारी सुरू केली आहे. संध्याकाळी सात वाजता महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री शपथ घेणार आहेत. यानंतर आता थोड्या वेळापूर्वी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाईव्ह येत एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार असल्याचं जाहीर केलं आहे. एकनाथ शिंदे यांचा गट आमच्या सोबत आला आहे. अजूनही अपक्ष आमच्यासोबत आले आहेत. याबाबतचं पत्र आम्ही राज्यपालांना देणार असल्याचं देखील ते म्हणाले.
यानंतर एकनाथ शिंदे यांनी प्रसारमाध्यमांसमोर बोलताना म्हणाले कि, भाजपाकडे १२० आमदार आहेत. खरेतर मुख्यमंत्रीपद ते घेऊ शकले असते. पण त्यांनी मनाचा मोठेपणा दाखवून, बाळासाहेबांच्या शिवसैनिकाला संधी दिली. देवेंद्र फडणवीस, नरेंद्र मोदी आणि अमित शाहा यांचे आभार मानतो. पदासाठी हे केलेले नाही. ही ऐतिहासिक घटना आहे. राज्याच्या विकासाला पुढे घेऊन जाऊ. फडणवीस मंत्रिमंडळात नसले तरी ते आमच्यासोबत आहेत. असा मोठेपणा दिसत नाही, असं म्हणत शिंदेंनी फडणवीसांचे तोंड भरून कौतुक केलं.
दरम्यान, आज राजभवन येथे अतिशय छोटेखानी पद्धतीन शपथविधी सोहळा होणार आहे. बंडखोर गटाचे नेते एकनाथ शिंदे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरी पोहोचले होते. बंडखोरीनंतर एकनाथ शिंदे पहिल्यांदाच मुंबईत पोहोचले आहेत. थोड्याच वेळात ते राज्यपालांचीही भेट घेणार आहेत. एकनाथ शिंदे आज गोव्याहून मुंबईत पोहोचले आहेत.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
