🕒 1 min read
मुंबई : पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) २०२२/२३ हंगामासाठी प्रथमच वनडे, टी-२० आणि कसोटी संघातील खेळाडूंचा स्वतंत्र करार जाहीर केला. यंदाच्या करारात काही खेळाडूंनाच दोन्ही करार मिळाले आहेत. दोन्ही करारांमध्ये बाबर आझम, मोहम्मद रिझवान आणि शाहीन आफ्रिदी यांनाच ए श्रेणीत ठेवण्यात आले आहे. याशिवाय इमाम-उल-हक आणि हसन अली यांनाही दोन्ही करार मिळाले आहेत. गेल्या वर्षीच्या खराब कामगिरीमुळे भारताचा जावई हसन अलीची पदावनती करण्यात आली आहे. अलीला कसोटीत बी श्रेणीत आणि वनडे, टी-२०मध्ये सी श्रेणीत ठेवण्यात आले आहे.
इमाम-उल-हक गेल्या वर्षी सी श्रेणीत होता, परंतु यावेळी त्याला वनडे, टी-२०मध्ये बी श्रेणीत बढती देण्यात आली आहे, तर त्याला कसोटीमध्ये सी श्रेणीमध्ये ठेवण्यात आले आहे. यावर्षी प्रथमच पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने लाल आणि पांढऱ्या चेंडूंसाठी स्वतंत्र करार प्रणाली लागू केली आहे. त्याचवेळी, करारामध्ये समाविष्ट करण्यात येणार्या खेळाडूंची संख्याही २० वरून ३३ करण्यात आली आहे.
33 players receive contracts in improved men's central contracts list for 2022-23 ????
Babar Azam, Shaheen Afridi, Imam-ul-Haq, Hasan Ali, Mohammad Rizwan earn both red and white-ball contracts ????
More details: https://t.co/BUZa6lxOKu
???? PCB#PakistanCricket pic.twitter.com/l6QZwcDUOh
— Cricket Pakistan (@cricketpakcompk) June 30, 2022
याशिवाय, पीसीबीने सर्व फॉरमॅट खेळणाऱ्या सदस्यांसाठी मॅच फीमध्ये १०% वाढ केली आहे. न खेळणाऱ्या सदस्यांच्या शुल्कातही वाढ करण्यात आली आहे; यापूर्वी त्यांना खेळणाऱ्या सदस्यांच्या कमाईपैकी ५०% मॅच फी म्हणून मिळत असे, परंतु आता त्यांना ७०% मिळेल. संघाच्या कर्णधाराला त्या भूमिकेसह येणाऱ्या अतिरिक्त जबाबदाऱ्यांची भरपाई करण्यासाठी कर्णधार भत्ता सुरू करण्यात आला आहे.
दोन्ही करार
बाबर आझम, मोहम्मद रिझवान, शाहीन शाह आफ्रिदी (श्रेणी ए), हसन अली (रेड बॉल श्रेणी बी, व्हाईट बॉल श्रेणी सी) आणि इमाम-उल-हक (रेड बॉल श्रेणी सी, व्हाईट बॉल श्रेणी बी) )
कसोटी करार
- ए श्रेणी – अझहर अली, बाबर आझम, शाहीन आफ्रिदी, मोहम्मद रिझवान.
- बी श्रेणी – फवाद आलम.
- सी श्रेणी – अब्दुल्ला शफीक, नसीम शाह आणि नौमान अली.
- डी श्रेणी – आबिद अली, सरफराज अहमद, सौद शकील, शान मसूद आणि यासिर शाह.
वनडे, टी-२० करार
- ए श्रेणी – फखर जमान आणि शादाब खान
- बी श्रेणी – हरिस रौफ
- सी श्रेणी – मोहम्मद नवाज
महत्त्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
