Share

डोनाल्ड ट्रम्प यांना दिला जबरदस्त दणका; ट्विटरने उचलले मोठे पाऊल

Published On: 

वॉशिंग्टन : ट्रम्प समर्थकांनी अमेरिकेच्या संसदेला घेराव घालत प्रचंड गोंधळ घातला. ट्रम्प समर्थकांनी केलेल्या भयंकर हिंसाचारानंतर ट्रम्प यांचे ट्विटर अकाऊंट ट्विटरने कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. ट्विटरने अमेरिकेत हिंसाचाराच्या झालेल्या उद्रेकानंतर आणि भविष्यातही हिंसेला चिथावणी देण्याची भीती व्यक्त करत ट्रम्प यांचे ट्विटर अकाऊंट बंद केले आहे.

दरम्यान, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्रपती निवडणुकीत झालेला पराभव मान्य नसल्याने त्यांच्या समर्थकांनी अमेरिकन संसदेत घुसून धुडगूस घातला होता. या हिंसाचाराला डोनाल्ड ट्रम्प यांच्या ट्विटने देखील खतपाणी घातले होते.

निवडणूक निकालांबाबत अमेरिकेच्या संसदेची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत इलेक्टोरल कॉलेजबाबत चर्चा सुरु होती. बैठकीत जो बायडन यांच्या विजयाची घोषणा केली जाणार होती. परंतु त्याचवेळी ट्रम्प समर्थक कॅपिटल बिल्डिंगमध्ये घुसले व त्यांनी धुडगूस घातला. याबाबत ट्रम्प यांनी केलेले ट्विट ट्विटरकडून त्वरित हटविण्यात आले होते.

दरम्यान, युएस संसदेत झालेल्या घटनेनंतर सुरवातीला 12 तासांसाठी ट्रम्प याचं ट्विटर अकाऊंट निलंबित करण्यात आलं होतं. तसेच, भडकावू ट्विट करण्याचं सत्र असंच सुरु राहिल्यास अकाऊंवर कायमस्वरूपी बंदीची कारवाई केली जाऊ शकते, अशी ताकिदही त्यांना ट्विटरकडून देण्यात आली होती. मात्र ट्रम्प यांनी ही बाब गांभीर्याने न घातल्यामुळे अखेर त्यांच्या अकाऊंवर कायमस्वरूपी बंदीची कारवाई करण्यात आल्याच ट्विटरने स्पष्ट केले आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!