Share

उद्या मोदींचा पराभव लोकशाही मार्गाने झाला तर ते सुद्धा…; शिवसेनेची मोदींवर टीका

Published On: 

🕒 1 min read

मुंबई:- ट्रम्प यांचे ‘झुंड’ सरळ अमेरिकेच्या संसदेत घुसले. त्यांनी संसदेवर हल्ला केला. अमेरिकेच्या संसदेत गोळीबार करून परिस्थिती नियंत्रणात आणावी लागली. हे धक्कादायक आहे. अमेरिकेच्या संसदेत जे घडले ते जगात कोणत्याही देशात घडू नये. पंतप्रधान मोदी यांनी आता ट्रम्प यांचा निषेध केला. मात्र याआधी ट्रम्पची भलामण केली याचेही दुःख त्यांना होतच असेल! असे म्हणत सामना अग्रलेखातून शिवसेनेने मोदींना टोला लगावला आहे.

शिवसेनेनं सामना’च्या अग्रलेखातून अमेरिकेत उफाळून आलेल्या राजकीय संघर्षावर भाष्य करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही चिमटे काढले आहेत. निवडणुकीचा निर्णय फिरविण्यात यावा यासाठी ट्रम्प यांनी यंत्रणेवर दबाव आणला. भ्रष्टाचाराचे मोह निर्माण केले, पण यापैकी एकही यंत्रणा ट्रम्प यांच्यापुढे नमली नाही. ट्रम्प यांनीच नेमलेले हे सर्व लोक होते. पण त्या सगळ्यांनी अमेरिकेच्या संविधानाशीच आमची बांधीलकी असल्याचे स्पष्ट केले. हे सर्व प्रयोग कोसळले तेव्हा एखाद्या गुंडाप्रमाणे ट्रम्प यांनी लोकांना चिथावणी दिली. ट्रम्प यांचे ‘झुंड’ सरळ अमेरिकेच्या संसदेत घुसले. त्यांनी संसदेवर हल्ला केला. अमेरिकेच्या संसदेत गोळीबार करून परिस्थिती नियंत्रणात आणावी लागली. हे धक्कादायक आहे. अमेरिकेच्या संसदेत जो हिंसाचार घडला त्याबद्दल आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अतीव दुःख व्यक्त केले आहे, असं शिवसेनेनं म्हटलं आहे.

ट्रम्प यांनी आता सत्तेचे हस्तांतरण करण्यास मान्यता दिली आहे. म्हणजे जगावर मोठे उपकारच केले म्हणायचे! हिंदुस्थानातील लोकशाहीकडून अमेरिका, ब्रिटनने धडे घ्यायला हवेत. निवडणुकीत पराभव होताच इंदिराजी, राजीव गांधी, अटलबिहारी वाजपेयी, मनमोहन सिंग अशा प्रत्येक नेत्याने शांतपणे सत्तेचे हस्तांतरण केले आहे. उद्या मोदींचा पराभव लोकशाही मार्गाने झाला तर तेसुद्धा त्याच परंपरेचे पालन करतील. म्हणून प्रिय मित्र असूनही ट्रम्प यांच्या झुंडशाहीचा धिक्कार पंतप्रधान मोदी यांनी केला आहे. अमेरिका व हिंदुस्थानच्या लोकशाहीत साम्यस्थळे नाहीत. विसंगतीच जास्त आहे. आमच्याकडे निवडणुकांत पराभव होऊ नये यासाठीच हिंसाचार, धर्मद्वेषाचे राजकारण पेटवले जाते. केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करून विरोधकांना हतबल केले की त्यांच्यावर गोळ्या झाडण्याची वेळच येत नाही. प्रे. ट्रम्प हे आमच्या देशात येऊन काय शिकले? अमेरिकेच्या संसदेत जे घडले ते जगात कोणत्याही देशात घडू नये. पंतप्रधान मोदी यांनी आता ट्रम्प यांचा निषेध केला. मात्र याआधी ट्रम्पची भलामण केली याचेही दुःख त्यांना होतच असेल, असा निशाणा शिवसेनेनं मोदींवर साधला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!