🕒 1 min read
मुंबई : गणपती बाप्पाच्या आगमनाची तयारी सध्या सर्वत्र सुरु आहे. अनेकजण दरवर्षी बाप्पाच्या येण्याची आतुरतेने वाट पाहत असतात. बॉलिवूड सेलीब्रीटीच्या घरी देखील गणेशोत्सवाची जोरदार तयारी सुरु असते. नुकतेच अभिनेत्री शिल्पा शेट्टीने गणपतीची मूर्ती घरी आणली. तिचा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल होत आहे.
शिल्पा शेट्टीचे पती आणि उद्योगपती राज कुंद्रा यांना मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने पोर्नोग्राफी प्रकरणात अटक केल्यापासून शिल्पासह तिचे कुटुंबा पुढे अनेक अडचणी आहेत मात्र असे असताना देखील तिने यावर्षी देखील जल्लोषात गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय शिल्पानं घेतला आहे. यावेळी यंदा एकट्या शिल्पानेच ही मूर्ती घरी आणताना दिसली आहे.
https://www.instagram.com/reel/CTjfYOsoI_I/?utm_source=ig_web_copy_link
दरम्यान, पतीला अटक झाल्यापासून शिल्पाला सोशल मीडियावर खूप ट्रोल केले गेले. यामुळे तिला आणि कुटुंबाला अधिक मनस्ताप सहन करावा लागला होता. मात्र या कठीण परिस्थितून ती स्वत: ला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. तसेच यावेळी देखील सर्व दुख बाजूला ठेऊन उत्साहात बाप्पाचे आगमन केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘या रूटच्या सर्व लाईन व्यस्त आहेत…औरंगाबादेत अग्निशमन विभाग ‘ऑन कॉल’!
- ‘लोकांचा आक्रोश मी पाहिलाय, त्यांना कसं आवरलं हे मला माहिती; सरकारला तोडगा काढायचा नाही का?’
- राज्यात सुरु असलेली डिस्को, बार, पब ही आरोग्य केंद्रे आहेत का? शेलारांचा मुख्यमंत्र्यांना सवाल
- ‘माझ्या बहिणीच्या पाठीशी मी सदैव आहेच!’, धनंजय मुंडेंचे सूचक वक्तव्य
- कंगनाचे ‘थलायवी’ चित्रपटाचे प्रमोशन; शेअर केला साऊथ इंडियन लुक
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
