Share

जातीयवादी पक्ष एकत्र आले तरी काँग्रेसला फरक पडणार नाही-नाना पटोले

Published On: 

मुंबई : राज्यात भाजप मनसे संभाव्य युतीची जोरदार चर्चा चालू आहे. जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुकीत मनसे-भाजप युती होण्याची दाट शक्यता आहे. पालघरमध्ये मनसे- भाजप युतीचा नारळ देखील फुटला आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना विचारले असता त्यांनी खोचक शब्दात प्रतिक्रिया दिली आहे. जातीयवादी पक्ष एकत्र आले तरी काँग्रेसला फरक पडणार नाही अशा शब्दात त्यांनी या संभाव्य युतीवर टीका केली आहे.

दोन महिन्यांपूर्वी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतल्याने मनसे-भाजप युती होणार का अशा चर्चांना जोर आला होता. याच पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी भाजपशी युती करावी अशी मागणी मनसेच्या पुण्यातील नेत्यांनी राज ठाकरेंकडे केली होती. असे असताना भाजप-मनसे युतीचा बिगूल वाजला असून पालघर जिल्ह्यात पोटनिवडणुकीसाठी मनसे आणि भाजप एकत्र आले आहेत.

महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीचे बिगुल वाजलेल असताना विविध पक्षांच्या बैठका पार पडायला सुरुवात झाली आहे. निवडणुकीसाठी त्यांनी रणनिती आखायलाही सुरुवात केली आहे. याच सगळ्या पार्श्वभूमीवर पत्रकारांनी नाना पटोले यांना प्रश्न विचारला असता त्यांनी जातीयवादी पक्ष एकत्र आले तरी काँग्रेसला फरक पडणार नाही असे सांगितले.

दरम्यान महापालिकेच्या आगामी निवडणुकीत पुण्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेना भाजपसोबत जाण्याबाबत पक्षाने अद्याप कोणताही अंतिम निर्णय घेतलेला नाही. मनसे भाजपसोबत जाण्याच्या तयारीत असलेल्या चर्चेला मनसेने तूर्तास विराम दिला आहे. त्यामुळे शहर पदाधिकाऱ्यांनी याबाबत कोणतेही वक्तव्य करू नये, असे आदेशच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सर्व पदाधिकाऱ्यांना दिले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!