Share

‘ठाकरे सरकारने नितेशजींना अटक केली, तरीही न्यायालयात ही कारवाई टिकणार नाही’

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: कणकवलीत सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत (Satish Sawant) यांचे प्रचार प्रमुख असलेल्या संतोष परब (Santosh Parab) यांच्यावर चाकू हल्ला झाला होता. संतोष परब हे करंजे गावचे माजी सरपंच असून जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांचे निकटवर्तीय आहेत. इनोव्हा कारमधून आलेल्या दोघांनी तीक्ष्ण चाकूने त्यांच्यावर वार केले होते. याप्रकरणी भाजपा नेते नितेश राणे (Nitesh Rane) यांच्यावर संशयाची टांगती तलवार असून २१ डिसेंबर रोजी पोलिसांनी त्यांची अर्धा तास चौकशी केली. आता नितेश राणेंना अटक होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. याच पार्श्वभूमीवर आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील(Chandrakant Patil) यांनी भाष्य केले असून ठाकरे सरकारने नितेशजींना अटक केली, तरीही न्यायालयात ही कारवाई टिकणार नाही, असे पाटील म्हणाले आहे.

यासंदर्भात चंद्रकांत पाटील यांनी ट्विट केले असून ट्विटमध्ये ते म्हणाले आहेत की,’आपल्याविरोधात उठणारा आवाज दाबण्यासाठी हे सरकार वारंवार असंवैधानिक मार्गांचा वापर करते. नितेश राणे यांचा आवाज दडपण्याचे प्रयत्न केले जात आहेत, परंतु त्यांना उत्तर देण्यासाठी राणे परिवार व भाजपा समर्थ आहे.’ तसेच ठाकरे सरकारने नितेशजींना अटक केली, तरीही न्यायालयात ही कारवाई टिकणार नाही, असे चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी नितेश राणेंनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंना(Aditya Thackeray) बघून ‘म्याव म्याव’ असा आवाज काढत शिवसेनेला डिवचले होते. यामुळे आता विधानसभेत सत्ताधाऱ्यांनी आक्रमक पावित्रा घेतला असून शिवसेना आमदार सुनील प्रभू यांनी नितेश राणेंच्या निलंबनाची मागणी केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!