मुंबई : मुंबई विमानतळाच्या नावावरून सध्या महाराष्ट्रात नवा वादंग निर्माण झाला आहे. विमानतळाच्या व्यवस्थापनाचा ताबा अदानी यांच्या कंपनीकडे गेल्यामुळे त्याठिकाणी अदानी एअरपोर्ट्स असे नावाचे बोर्ड लावण्यात आले होते. हे सर्व बोर्ड्स आज शिवसैनिक आणि भारतीय कामगार सेनेच्या कार्यकर्त्यांनी फोडले. अदानी उद्योग समूहाने मुंबई विमानतळाला ‘अदानी एअरपोर्ट्स’ असं नाव लावलं होतं. या संदर्भात अनेक तक्रारी शिवसैनिकांकडे आल्या. त्यानंतर संतप्त शिवसैनिकांनी आणि भारतीय कामगार सेनेने विमानतळाला लावलेले अदानी एअरपोर्ट्सचे नाव फोडून टाकले.
यावर आता विविध राजकीय नेत्यांकडून प्रतिक्रिया येत आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नेते व मंत्री नवाब मलिक यांनी देखील यावर भाष्य केले आहे. ‘ अदानी समूहाने छत्रपती शिवाजी महाराज विमानतळाचे शेअर्स GVK कडून विकत घेतल्याने त्याची मालकी अदानी यांच्याकडे गेली याचा अर्थ असा नाही की त्यांनी विमानतळाचे नाव बदलून स्वतःचे नाव द्यावे. व्यवस्थापन अदानी यांच्याकडे असले तरी विमानतळाला नाव देण्याचा अधिकार त्यांना नाही.’ असे मत त्यांनी ट्वीट करून मांडले आहे.
तसेच ‘अदानी समुहाची चूक झाली असून व्यवस्थापन वा मालकी अदानी समुहाची असल्याचे ते लिहू शकतात पण मुख्य नाव त्यांना बदलता येणार नाही. विमानतळाचे नाव बदलल्यानंतर संतप्त प्रतिक्रिया उमटली आहे. अदानी समुहाने यापुढे लोकांच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत याची दक्षता घ्यावी.’ अशी सूचना देखील त्यांनी यावेळी केली आहे.
दरम्यान काही दिवसांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ पूर्णपणे अदानी समूहाच्या ताब्यात गेले आहे. मुंबई विमानतळाचा ताबा मिळताच विमानतळावर व बाहेर अदानी विमानतळ असे नामफलक लावण्यात आले आहेत. त्यामुळे संतप्त शिवसैनिकांनी आज व्हीआयपी गेट नंबर 8 आणि विलेपार्ले हायवेवरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासमोरील बोर्ड लाठ्यांनी तोडला. मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्यात आले आहे. मात्र तिथे अदानी विमानतळ असे लावलेले बोर्ड अजिबात सहन केले जाणार नाहीत, असं शिवसैनिकांचं मत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- बारावीच्या निकालाचं अखेर ठरलं; वाचा कधी आणि कसा पाहता येणार राज्य बोर्डाच्या बारावीचा निकाल
- ‘लांब फेकणारा खेळाडू टोकियोला गेला नाही, त्यामुळे भारताने गोल्डन संधी गमावली’, काँग्रेसचा टोला
- ‘शब्दांचे खेळ, भावनिक आवाहन, ड्रायव्हिंगशिवाय येतंय काय? मग शरद पवारांनी कौतूक केले कशाचे?’
- प्रत्येक यशस्वी ऑलिम्पिक मेडल विजेत्याच्या मागे पंतप्रधानांचा मोठ्ठा फोटो असतो; भाई जगताप यांची टीका
- …तोपर्यंत कोरोनापासून कुणीही सुरक्षित असणार नाही – आदित्य ठाकरे


