Share

भाजप-मनसे एकत्र आले तरी महापालिकेवरील शिवसेनेचा भगवा खाली उतरणार नाही – संजय राऊत

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : राज्यात विधानसभा निवडणुकीनंतर आता महत्वाच्या शहरांच्या महापालिका निवडणुका जवळ आल्या आहेत. शिवसेनेनं भाजपची साथ सोडल्यानंतर येत्या निवडणुकांमध्ये भाजप स्वबळावरच लढणार की मनसे सोबत युती करणार याबाबत सध्या चर्चांना उधाण आलं आहे. शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस हे तीन पक्ष एकत्र आल्याने भाजपसमोर मोठं आव्हान असून स्थानिक पातळीवर आघाडीची समीकरणे मात्र बदल्याची शक्यता आहे.

स्थानिक नेते-कार्यकर्ते, तेथील परिस्थिती याचा विचार करता उत्सुक नेत्यांना संधी देण्यासाठी स्वबळाचा नारा पक्षांकडून दिली जाण्याची शक्यता आहे. मात्र, महाविकास आघडीला शह देण्यासाठी भाजप-मनसे महापालिका निवडणुकांसाठी एकत्र आल्यास फायदा होऊ शकतो. अद्याप तरी दोन्ही पक्षांकडून युतीची शक्यता नाकारली जात असली तरी आज भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीमुळे चर्चांना उधाण आलं आहे.

नाशिक महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे हे नाशिक दौऱ्यावर आहेत. तर, चंद्रकांत पाटील हे देखील नाशिक दौऱ्यावर आहेत. आज सकाळी या दोन्ही नेत्यांची नाशिकच्या विश्रामगृहाच्या दारातच भेट झाली. दरम्यान, निवडणुकांबाबत चर्चा झाली नसल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले असले तरी मनसे-भाजप एकत्र एयन्याच्या शक्यतेवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

‘अशी समीकरणे राजकारणात होत असतात. पण महापालिकेवरील शिवसेनेचा झेंडा खाली उतरणार नाही,’ असा दावा संजय राऊत यांनी केला आहे. नाशिकसह मुंबई, पुणे, औरंगाबाद, पिंपरी-चिंचवड, कोल्हापूर आदी महापालिकांच्या निवडणुका येत्या काळात होणार आहेत. या सर्वच शहरांमध्ये मनसे-भाजप एकत्र आल्यास महाविकास आघडीला सत्तेपासून दूर ठेवण्यात भाजपला यश येऊ शकतं अशा चर्चा सध्या सुरु आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!