🕒 1 min read
मुंबई : शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने मिळून राज्यात सत्ता स्थापन केल्यापासून काही ना काही मुद्द्यांवरून आघाडीत बेबनाव असल्याचं वारंवार समोर येत आहे. स्वबळाचा नारा, निधी वाटप, खात्यांमधील अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोरोना नियमावली, श्रेयवाद, आदी मुद्द्यांवरून महाविकास आघाडीतील तणाव वाढल्याचे समोर येत आहे.
अशातच, काल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यानंतर, शिवसेना खासदार संजय राऊत हे पवारांच्या निवासस्थानी गेले होते. यामुळे राज्यासह दिल्लीत देखील नेत्यांच्या भेटीगाठींचे सत्र सध्या वाढले असून अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शिवसेना-राष्ट्रवादीवरच आरोप केले असून पाळत ठेवण्याच्या आरोपावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तीव्र नाराजी वर्तवली होती.
त्यामुळेमी महाविकास आघडी स्थापन झाल्यापासून काँग्रेसमुळे तणाव अधिक वाढत असून काँग्रेसला डच्चू देत भाजप-शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे तीन पक्ष येण्याची शक्यता आहे का ? असा सवाल संजय राऊत आला. यावर त्यांनी ‘अशी स्वप्नं पडणं हा आजार आहे. असे काही होणार नाही. महाविकास आघाडीचं सरकार 5 वर्ष चालेल,’ असं उत्तर दिलं. एका खाजगी वृत्तवाहिनीशी संजय राऊत यांनी संवाद साधला असता त्यांना राज्यातील नव्या समीकरणाबाबत प्रश्न करण्यात आला होता.
महत्त्वाच्या बातम्या
- मुंबईत पावसाचं रौद्ररूप : महापौर म्हणतात, ‘तीन-तीन वेळा जाऊन इशारा दिला, पण…’
- अनिल देशमुखांच्या अडचणी वाढणार ? ईडीचा काटोल आणि वडविहिरातील निवासस्थानी छापा
- ‘अमोल कोल्हे फार डोकं चालवू नका; ज्या उद्धव साहेबांच्या मेहेरबानीमुळे राजकारणात आलात, त्यांनाच विसरलात’
- ‘मी राज्याचा अध्यक्ष; पण आमचे निर्णय देवेंद्र फडणवीसच घेतात’
- पाकिस्तानच्या विजयानंतर आफ्रिदीने केले जावयाचे कौतुक म्हणाला…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
