मुंबई : काल रात्रीपासून मुंबईसह उपनगरांमध्ये पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. यामुळे अनेक सखल भागांमध्ये पाणी साचण्यासह भिंत, इमारत कोसळून दुर्घटना झाल्या आहेत. तीन दुर्घटनांमध्ये २० हुन अधिक नागरिकांचा मृत्यू झाला असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील शोक व्यक्त केला आहे.
हाती आलेल्या माहितीनुसार काल संध्याकाळपासून मुंबईतील अनेक भागांमध्ये तब्बल २०० मिलीमीटर पेक्षा अधिक पाऊस झाला आहे. यामुळे दरड कोसळणे, अनेक भागांमध्ये पाणी तुंबणे अशा घटना घडल्या आहेत. दरम्यान, याबाबत मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देतानाच मुंबईकरांना पुन्हा एकदा सावधानतेचा इशारा दिला आहे.
‘महापालिकेच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. तीन-तीन वेळा जाऊनही लोक बाहेर निघायला तयार होत नाहीत. मग अशावेळी महापालिका किंवा एखादी यंत्रणा कारवाई करायला जाते. त्यावेळी त्याला विरोध होतो. चेंबूरमधील घटनेची माहिती घेतली. त्यावेळी अधिकाऱ्यांनी हेच सांगितलं. त्याठिकाणच्या नागरिकांना तीन-तीन वेळा जाऊन सांगण्यात आलं होतं. तुमची घरं दरडीच्या खालीच आहेत, असंही महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी त्यांना सांगितलं होतं,’ अशी माहिती महापौर पेडणेकर यांनी दिली आहे.
‘पावसाळ्यात होणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन तुम्ही पावसाळ्यात तरी दुसरीकडे चला असं सांगण्यात आलं होतं. इतर ठिकाणीही लोकांना दरवर्षी दुसरीकडे स्थलांतरीत केलं जातं. त्यामुळे स्वतः जीव वाचवण्यासाठी नागरिकांनीही खबरदारी घेतली पाहिजे. घडलेली घटना क्लेशदायक आहे. पण नागरिकांना हेच आवाहन आहे की लोकांनी महापालिकेला सहकार्य केलं पाहिजे,’ असं देखील पेडणेकर म्हणाल्या.
महत्त्वाच्या बातम्या
- अरारा रा.. खतरनाक! विजयासाठी ३५ धावा असताना मारले सलग सहा षटकार
- अनिल देशमुखांच्या अडचणी वाढणार ? ईडीचा काटोल आणि वडविहिरातील निवासस्थानी छापा
- ‘अमोल कोल्हे फार डोकं चालवू नका; ज्या उद्धव साहेबांच्या मेहेरबानीमुळे राजकारणात आलात, त्यांनाच विसरलात’
- ‘मी राज्याचा अध्यक्ष; पण आमचे निर्णय देवेंद्र फडणवीसच घेतात’
- पाकिस्तानच्या विजयानंतर आफ्रिदीने केले जावयाचे कौतुक म्हणाला…


