मुंबई : यंदा शिवसेना पक्षाचे दोन मेळावे होणार आहेत. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटाचा बीकेसी मैदानावर होणार आहे. तर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा मेळावा शिवाजी पार्कवर. दोन्ही गटांकडून शक्तीप्रदर्शन केलं जात आहे. तसेच दोन्ही गटातील नेत्यांकडून एकमेकांवर आरोप, टोलेबाजी करण्यात येत असल्याचं आपण गेली अनेक दिवस पाहत आलो आहोत. आजही मेळाव्यात दोन्ही गट एकमेकांवर सडकून टीका करतील, यात कोणतीच शंका नाही. मात्र शिवसेना (Shivsena) पक्षाकडून मेळाव्याआधीच सामना अग्रेलखातून शिंदे गटावर निशाणा साधण्यात आला आहे.
शिवसेना पक्षाचा शिंदे गटावर हल्ला
‘खोके’वाल्यांचा अधर्म या निष्ठsपुढे कसा टिकेल? जेथे धर्म तेथे जय. शिवतीर्थाच्या रणमैदानावर धर्म आहे. त्यामुळे जय नक्की आहे, असं म्हणत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिंदे गटावर हल्ला केला आहे. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना (Samana) अग्रलेखात हे म्हटलं आहे. आज शिवतीर्थावर विचारांचे सीमोल्लंघन होईल. कोणी कितीही अपशकुन करू द्या, महाराष्ट्रात शिवसेनेचाच भगवा फडकत राहील. आज मुंबईवर शिवसेनेचे राज्य आहे. तुमच्या छाताडावर बसून पुन्हा मुंबई जिंकूच.
शिवसेनेच्या पुढील लढ्याच्या नव्या पर्वाला सुरुवात
दसरा मेळाव्यासाठी शिवसेनेला शिवाजी पार्क म्हणजे बाळासाहेबांचे शिवतीर्थ मिळू नये यासाठी कारस्थाने झाली. शेवटी न्यायालयाने न्याय केला. ज्या शिवाजी पार्कवरून शिवसेनाप्रमुखांनी हिंदुत्वाचे, मराठी अस्मितेचे रणशिंग फुंकले, महाराष्ट्र जागा केला, एक बलाढ्य संघटन उभे केले त्या शिवतीर्थावरच शिवसेनेविरुद्ध मराठी माणसाला लढविण्याचे पाप भाजपाच्या कमळाबाईंनी केले. मात्र आता शिवसेनेच्या पुढील लढ्याच्या नव्या पर्वाला सुरुवात पुन्हा एकदा शिवाजी पार्कच्याच या रणमैदानावरून होत आहे ही मोठी योगायोगाची गोष्ट आहे. कारण महाराष्ट्राचे भवितव्य जर कुठे निर्माण झाले असेल तर याच रणमैदानावर, याच रणक्षेत्रावर. संयुक्त महाराष्ट्राचा लढा याच मैदानावर सुरू झाला आणि याच मैदानावर पूर्ण झाला. शिवसेनेचे प्रत्येक रणशिंग बाळासाहेबांनी याच मैदानावर फुंकले. आता शिवसेनेच्या नव्या लढ्याची नांदी याच ठिकाणी होत आहे.
भाजप महाराष्ट्राच्या इतिहासातून नष्ट होईल
तसेच, पुढील निवडणुकीत कमळाबाईंची अशी जिरणार आहे की, भाजप (BJP) महाराष्ट्राच्या इतिहासातून नष्ट झालेला दिसेल. पुढच्या पिढीला कळणारदेखील नाही की, भाजपा नावाचा एक पक्ष महाराष्ट्रात होता व तो महाराष्ट्राच्या मुळावर आला होता. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून सच्चा शिवसैनिक चालत, धावत, मिळेल त्या वाहनाने शिवतीर्थाकडे निघाला आहे. रणमैदान सज्ज होत असल्याचं अग्रलेखात म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Jasprit Bumrah । टी-20 वर्ल्डकपमधून बाहेर गेल्यानंतर बुमराहनं मौन सोडलं; हृदय जिंकणारा संदेश शेअर केला
- Shivsena । आदित्य ठाकरेंनी सांभाळून बोलावं, आम्ही तोंड उघडलं तर…; गुलाबराव पाटलांचा थेट इशारा
- Shivsena । दसरा मेळाव्यासाठी निघालेल्या शिंदे गटाच्या वाहनांचा अपघात; ८ ते १० गाड्या एकमेकांवर आदळल्या
- Weight Loss Tips | दररोज ‘ही’ योगासने केल्यामुळे होऊ शकते पोटावरील चरबी कमी
- INC । “शिंदे गटाने दसरा मेळाव्याच्या बसेससाठी १० कोटी रुपये कुठून आणले?, ही मनी लाँडरींग तर नाही ना?”; काँग्रेसची मागणी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

