अहमदाबाद : ऑस्ट्रेलिया दौऱ्यात विजयी खेळीनंतर त्यानं इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतही अविश्वसनीय कामगिरी करून भारताच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला. त्याच्या या खेळीने पंतने जगाला स्वतःची दखल घेण्यास भाग पाडले. भारतीयच नव्हे तर जगभरातील अनेक दिग्गज आता रिषभसाठी कौतुकाचा पूल बांधताना दिसत आहेत.
यादरम्यान, रोहित शर्माने ऋषभ पंतसाठी प्रसारमाध्यमांना त्याच्यावर दबाव न आणण्याची विनंती केली आहे. इंग्लंडविरोधातील टी-२० मालिकेआधी रोहित शर्माने प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्याने ऋषभ पंतला जर त्याच्या मनाप्रमाणे खेळण्याची संधी दिली तर तो असाच दमदार कामगिरी करत राहील असा विश्वास व्यक्त केला आहे.
ऋषभ पंतची कामगिरी यापुढे उंचावत राहील असं सांगताना रोहित शर्माने प्रसारमाध्यमांनाच एक प्रश्न विचारला. “आम्ही त्याला एकटं सोडलं असून मनाप्रमाणे खेळण्याची मोकळीक दिली आहे. संघ व्यवस्थापन म्हणून आम्ही हे करण्यासाठी तयार आहोत. पण मला तुम्हालाही हाच प्रश्न विचारायचा आहे, तुम्ही हे करण्यासाठी तयार आहात का?,” असं रोहित शर्माने विचारलं. “ऋषभ पंतला त्याच्या मनासारखं खेळू दे आणि तो तुम्हाला अशा अनेक खेळी दाखवेल. मी याआधीही अनेकदा सांगितलं आहे की, पंतला एकट्याला सोडा आणि तो तुम्हाला चांगली कामगिरी करताना दिसेल,” असं रोहित शर्माने म्हटलं. “त्याची खेळी उंचावतच जाणार आहे.
महत्वाच्या बातम्या
- मनपा प्रशासकांनी शेतमाल विक्रीसाठी जागा उपलब्ध करून द्यावी : आमदार बागडे
- … अन्यथा नाईलाजाने कडक निर्णय घ्यावे लागतील, मुख्यमंत्र्यांनी दिले लॉकडाऊनचे संकेत
- चिंताजनक! सातारा डोंगराला पुन्हा आग
- अंशतः लॉकडाऊनच्या पहिल्याच दिवशी कोरोना बाधितांचा आकडा हजारांच्या जवळ, नऊ कोरोनबाधितांचा मृत्यू
- परभणीमधील वीज पुरवठा सुरळीत करण्याचे युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू

