Share

महसूल पथकाच्या अंगावर टिप्पर घालणाऱ्या आरोपीच्या पोलिसांच्या हातावर तुरी

Published On: 

जालना : महसूल पथकाच्या अंगावर टिप्पर घालण्याच्या प्रकरणातील संशयित आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फरार झाल्याचा प्रकार समोर आला आहे. जालना येतील कदीम पोलीस ठाण्यातील दोन कर्मचारी संशयित आरोपीला हायवा आणि चावी घेण्यासाठी त्याच्या घरी घेऊन गेले. मात्र, घरी गेल्यानंतर आरोपी पोलिसांना चकमा देऊन फरार झाला. या प्रकरणी आरोपीला नेताना हलगर्जी करणारे दोन्ही पोलीस कर्मचारी चौकशीच्या फेऱ्यात अडकले आहेत.

दरम्यान, गणेश काकडे असे या संशयीत आरोपीचे नाव असून तो जालन्यातील ढवळेश्वर भागातील रहिवासी आहे. कदीम ठाण्यातील दोन कर्मचाऱ्यांनी यास त्याच्या घरी नेले होते. घरी नेल्यानंतर संशयित आरोपी घरात जाऊन फरार झाला आहे. यामुळे दोन्ही कर्मचाऱ्यांच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्या दोन्ही कर्मचाऱ्यांची चौकशी करून वरिष्ठांना अहवाल देण्यात येणार आहे. अहवाल दिल्यानंतर वरिष्ठांकडून काही कारवाई होऊ शकते, असे डीवायएसपी सुधीर खिरडकर यांनी सांगितले.

डीवायएसपी सुधीर खिरडकर हे गुन्ह्याचा घटनाक्रम, कर्मचारी आरोपीशी कसे वागत होते आदी विविध विषयांवर चौकशी करून तो अहवाल पोलिस अधीक्षकांना देणार आहेत. नंतर या अहवालावर पोलिस अधीक्षकांकडून कारवाई केली जाणार आहे. दरम्यान, आरोपीला कोणते दोन कर्मचारी आरोपीला घेऊन गेले होते, त्यांची चौकशी होणार आसल्याचे सांगून काम करताना त्यांचा धीर खचू नये म्हणून निरीक्षक प्रशांत महाजन यांनी त्या कर्मचाऱ्यांची नावे देणे टाळले.

महत्त्वाच्या बातम्या

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!