मुंबई : श्रेया घोषाल ही बॉलिवूडमधील एक लोकप्रिय गायिका श्रेया घोषालला जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा. तिनं आपल्या मंत्रमुग्ध करणाऱ्या आवाजाच्या माध्यमातून तब्बल एक दशक रसिकांच्या मनावर राज्य केलं. आज संगीत क्षेत्रात येणारे अनेक नवे कलाकार श्रेयाला आपला आदर्श मानतात. परंतु तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल आज लोकप्रियतेच्या शिखरावर असलेल्या श्रेयाचं आयुष्य एका स्टेज शोमुळं बदललं होतं. या शोमुळं अचानकच ती प्रकाशझोतात आली. अन् भविष्यात ती लोकप्रिय गायिका होणार असे कयास नामांकित गायक व्यक्त करु लागले.
तब्बल 150 पेक्षा अधिक गाणी गाऊन तिनं रसिकांच्या मनावर राज्य केलं. सध्या ती बॉलिवूडपासून काही दूर आहे. मात्र सोशल मीडियाद्वारे ती कायम चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते. अलिकडेच तिनं आपण लवकरच आई होणार आहोत अशी घोषणा केली होती
अभिनेत्री अनुष्का शर्मा नंतर आता बॉलीवूड मधील गोड गळ्याची गायिका श्रेया घोषाल लवकरच आई बनणार आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून श्रेयाने ही गोड बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे. कोरोना काळात सध्या मनोरंजन विश्वातून अशाच खूप चांगल्या बातम्या येत आहेत. करीना देखील दुसऱ्यांदा आई झाली.
श्रेयाने ट्वीट करून लिहिले की, ‘बेबी श्रेयादित्य येत आहे. ही बातमी तुमच्यासोबत शेअर करताना मला आणि शीलादित्यला खूप आनंद होत आहे. तुमच्या आयुष्यातील एक नवीन अध्याय सुरू झाल्यामुळे आपणा सर्वांच्या प्रेम आणि आशीर्वादांची आम्हाला गरज आहे.’ श्रेयाने 2015मध्ये शिलादित्य मुखोपाध्यायशी लग्न केले होते.
महत्त्वाच्या बातम्या
- पोलीस उपनिरीक्षक असल्याचे भासवून वृद्धाची ७० हजारांची फवणूक
- अंशतः लॉकडाऊनच्या पहिल्याच दिवशी कोरोना बाधितांचा आकडा हजारांच्या जवळ
- पतीच्या नात्यातील तरुणाचा महिलेवर अत्याचार; आरोपीला ४ दिवसांची पोलिस कोठडी
- मनपा प्रशासकांनी शेतमाल विक्रीसाठी जागा उपलब्ध करून द्यावी : आमदार बागडे
- मराठा आरक्षणाच्या सद्यस्थितीवर अवलोकन बैठक घ्या-राजेंद्र दाते पाटील

