🕒 1 min read
उस्मानाबाद : जिल्ह्यात कोविड-१९ च्या संभाव्य तिसऱ्या लाटेची तीव्रता कमी करण्याच्या अनुषंगाने जास्तीत जास्त लाभार्थ्यांचे लसीकरण पूर्ण करणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी फिरते लसीकरण पथक ही ग्रामीण आणि शहरी भागासाठी कार्यरत करण्यात आले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ज्या नागरिकांचे कोविड लसीकरण राहिले आहे, त्या सर्वांणी लसीकरण करुन घेवून स्वत:चे आणि कुटुंबियांचे या आजारापासून संरक्षण करावे आणि जिल्हा कोविड मुक्त करण्यासाठी जिल्हा प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन मृद व जलसंधारण मंत्री तथा पालकमंत्री शंकरराव गडाख यांनी केले आहे.
केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये १६ जानेवारी पासून कोविड-१९ लसीकरण मोहिम राबविली जात आहे. आजतागायत जिल्ह्यामध्ये एकूण ९ लाख ६३ हजार ५०० डोसेस दिले गेलेले आहेत. यामध्ये पहिला डोस देण्यात आलेले ६ लाख ८८ हजार ६० नागरिक आहेत. दुसरा डोस देण्यात आलेले २ लाख ७५ हजार ४४० नागरिक आहेत. अद्याप ६ लाख २१ हजार नागरिकांना पहिला डोस देणे आवश्यक आहे. या शिल्लक असलेल्या नागरिकांचे लसीकरण पूर्ण करण्यासाठी विशेष कोविड लसीकरण मोहिम मिशन कवच कुंडल ८ ऑक्टोबर ते १४ ऑक्टोबर या कालावधीमध्ये जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. अशीही माहिती पालकमंत्री गडाख यांनी दिली.
या मिशन कवच कुंडल साठी जिल्ह्यामध्ये लसीकरण सत्रांची संख्या वाढविण्यात आली आहे. याबाबत जनजागृती करण्यात येत आहे. कोविड-१९ ची लस घेतल्यामुळे कोविड-१९ आजार होण्याचा धोका अत्यंत कमी होतो आणि आजाराची तीव्रता आणि मृत्यू टाळणे शक्य होते. याकरीता १८ वर्षावरील सर्व लाभार्थ्यांनी लवकरात लवकर लस घेणे आवश्यक आहे असे सांगून गडाख यांनी मिशन कवच कुंडल च्या अनुषंगाने उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये ग्रामीण आणि शहरी भागात लसीकरण सत्रांची संख्या वाढविण्या सोबतच सत्रांची वेळ सायंकाळी उशीरापर्यंत ठेवण्यात येत येत आहे. जेणे करुन सध्या सोयाबीन काढणी आणि शेती मधील इतर कामे करुन उशीरा परतणाऱ्या शेतकरी लाभार्थ्यांना लस घेणे सोईचे होणार आहे.
शहरामध्ये मोबाईल टिम्सद्वारे जोखीमग्रस्त भाग, कार्यालय इत्यादी ठिकाणी जावून लसीकरण करत आहेत. आरोग्य विभागासोबत महसूल, पंचायत, शिक्षण, महिला व बालकल्याण विभाग, पोलिस प्रशासन यांच्या सहभागाने सत्रांचे नियोजन आणि आयोजन करण्यात येत आहे, असेही पालकमंत्री गडाख यांनी स्पष्ट केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘शेतकऱ्यांच्या हत्याऱ्यांना हा ढोंगीपणाच वाटणार’, पटोलेंचे फडणवीसांना प्रत्युत्तर
- आघाडीच्या सर्वच नेत्यांची उस्मानाबादेत रॅली मात्र, बंदला संमिश्र प्रतिसाद
- जनतेला उत्कृष्ट आरोग्य सेवा मिळतील याकडे लक्ष द्या; एकनाथ शिंदे यांचे लोकप्रतिनिधींना आवाहन
- ‘नेतेगिरीचा अर्थ कुणालाही फॉर्च्युनरने चिरडणे नाही,’ भाजपा नेत्याचा घरचा आहे
- देशात लोकशाही राहिली नाही असेच चित्र; खासदार फौजिया खान यांचा केंद्र सरकारवर हल्ला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

