🕒 1 min read
कोपर्डी : मराठा आरक्षणासाठी खासदार संभाजीराजे हे महाराष्ट्रात दौरा करत आहे. आज त्यांनी अहमदनगरमधील कोपर्डीला भेट दिली. कोपर्डी अत्याचार झालेल्या पीडित महिलेच्या कुटुंबाला भेटण्यासाठी छत्रपती संभाजीराजे आज कोपर्डी आले होते. या वेळी संभाजीराजेंनी कोपर्डीच्या भगिनी यांना अभिवादन केले आणि पीडित कुटुंबाशी चर्चा केली. या वेळी आपल्याला न्याय मिळाला नाही, अशा भावना पीडित कुटुंबांनी राजे यांच्या समोर मांडल्या होत्या.
यावेळी संभाजीराजे यांनी निर्भयाच्या समाधीस्थळी जाऊन अभिवादन केलं. त्यानंतर पुन्हा घरात येऊन आई-वडिलांची भेट घेतली. निर्भया प्रकरणाचा खटला कुठवर आला आहे याची माहिती आई-वडिलांनी संभाजीराजे यांना दिली. हा खटला जलद गतीने चालून आरोपींना शिक्षा देण्याची मागणी संभाजीराजेंनी सरकारकडे केली आहे.
संभाजीराजे पुढे म्हणाले की, कोपर्डीच्या भगिनीला अभिवादन करण्यासाठी मी आलोय. माझी सरकारला विनंती आहे या प्रकरणी उच्च न्यायालयात एक अर्ज करावा आणि या खटल्यासाठी एक स्पेशल बेंच स्थापन करण्याची विनंती करावी. येत्या सहा महिन्यात हे प्रकरण निकाली काढावं. मी आई निर्भयाच्या वडिलांना भेटलो, त्यांचा खूप आक्रोश आहे. त्यांना न्याय पाहिजे. आज या प्रकरणाला चार वर्षे झाली. सरकारला माझी विनंती आहे तुम्ही उच्च न्यायालयात अर्ज करावा. या प्रकरणी मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहे. फुले शाहू यांचं आपण नाव घेतो आणि न्याय मिळत नाही, असं संभाजीराजे यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या
- ड्रायव्हिंग स्कूलसाठी जे नवे नियम जारी करण्यात आले आहेत ते नेमके आहेत तरी काय ?
- कसोटीचे महाभारत! सहावा सामन्यात मंयकच्या द्विशतकाने बांग्लादेश चित
- सहा षटकार मारल्यानंतर अशी होती धोनीची प्रतिक्रिया ; युवराज सिंगने सांगितला किस्सा
- ‘सौ चुहे खा के बील्ली चली हज को’ गैरवर्तनानंतर शाकिबने मागितली माफी
- फ्रेंच ओपन: जोकोविचा अंतिम फेरीत प्रवेश, नदालचा पराभव करत परतफेड
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
