Share

फुलंब्री तालुक्यात ‘एमआयडीसी’ची उभारणी करा; राष्ट्रवादीची उद्योग राज्यमंत्री आदिती तटकरेंकडे मागणी

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : फुलंब्री तालुक्यात ‘एमआयडीसी’ची उभारणी करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात आली आहे. याकरीता तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने उद्योग राज्यमंत्री आदिती तटकरे यांना निवेदन देऊन चर्चा केली. फुलंब्री तालुक्यात एमआयडीसी आल्यास तरुणांना रोजगार प्राप्त होईल. शिवाय गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेला तालुक्याचा विकास मोठ्या प्रमाणावर होईल. यासंदर्भात आदिती तटकरे यांनी विचार करण्याचे आश्वासन दिले आहे.

फुलंब्री तालुका होऊन २० वर्षे उलटली आहेत. हा तालुका औरंगाबाद शहराच्या लगत असूनही विकासापासून दूर आहे. आता नव्याने समृद्धी महामार्ग गेल्याने वाहतुकीला कोणतीही अडचण येणार नाही. उद्योग उभारणीकरिता लागणारी जागाही उपलब्ध आहे. येथे ‘एमआयडीसी’ सुरू झाल्यास स्थानिक बेरोजगार तरुणांना रोजगार मिळेल. तसेच तालुक्याच्या विकासाला चालना मिळू शकेल, अशी मागणी जिल्हा उपाध्यक्ष नितीन देशमुख, तालुकाध्यक्ष राहुल डकले यांनी तटकरे यांची भेट घेऊन केली.

‘दिल्ली- मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉरची व्याप्ती तालुक्याप्रमाणे वाढविता येईल का, याविषयी माहिती घेतली जाईल आणि नंतर ‘एमआयडीसी’चा विचार करू’ असे आश्वासन तटकरे यांनी यावेळी दिले. ‘फुलंब्रीत एमआयडीसीची स्थापना करण्यास पुरक स्थिती आहे. येथे मुबलक पाणी उपलब्ध आहे; तसेच सरकारची अनेक एकर जमीन आहे. यासंदर्भात आदिती तटकरे यांनी विचार करण्याचे आश्वासन दिले आहे,’ असे राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राहुल डकले यांनी सांगितले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!