Share

‘कोविन अ‍ॅपमधील त्रुटी गंभीर; लसीकरणाची प्रक्रिया सर्वांसाठी सोपी आणि सर्वसमावेशक असावी’

Published On: 

मुंबई : देशभरात कोरोना लसीकरण मोहिम सुरु आहे. लस घेण्यापूर्वी सर्व नागरिकांना अ‍ॅपवर नोंदणी करणे आवश्यक आहे. मात्र केंद्राने सांगितलेल्या कोविन अ‍ॅपमध्ये तांत्रिक अडचणी येत आहे. त्यामुळे लाखो नागरिकांची गैरसोय होत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने प्रत्येक राज्याला स्वतंत्र अ‍ॅप निर्मितीची परवानगी द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केली आहे.

कोविन अ‍ॅपमधील तांत्रिक अडचणींमुळे लाखो लोकांची गैरसोय होत आहे. त्यामुळे भारत सरकारने लसीकरण अ‍ॅपचे विकेंद्रीकरण करावे अशी मागणी जयंत पाटील यांनी केली आहे. कोविन अ‍ॅपमध्ये अनेक तांत्रिक त्रुटी जाणवत आहेत. लॉगिन व OTP साठी विलंब होत असल्याच्या अनेक तक्रारी येत आहेत. एका मध्यवर्ती अ‍ॅपवरून जवळपास १.३ अब्ज भारतीयांची वेळेवर नोंदणी होणे, हे अत्यंत आव्हानात्मक आहे. महत्त्वपूर्ण अशा या लसीकरण कार्यक्रमाची अंमलबजावणी प्रणाली मर्यादित स्वरूपाची असून त्यातील त्रुटी या अत्यंत गंभीर स्वरूपाच्या आहेत, असेही जयंत पाटील यांनी नमूद केले आहे.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रत्येक राज्याला स्वतंत्र अ‍ॅप तयार करून द्यावे किंवा महाराष्ट्र सरकारला स्वतःची अ‍ॅप निर्माण करण्याची परवानगी देण्यात यावी अशी विनंती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केली होती. केंद्र सरकारने यावर तात्काळ विचार करावा, असे जयंत पाटील म्हणाले यावेळी म्हणाले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!