Share

छत्रपती घराण्याचे अराध्य दैवत असलेल्या तुळजापूरात उभा राहतोय शिवछत्रपतींचा अश्वारुढ पुतळा

Published On: 

उस्मानाबाद : महाराष्ट्राची कुलस्वामिनी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे अराध्य दैवत असलेल्या तुळजाभवानीच्या तुळजापूरात छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारण्याची अनेक दिवसांची मागणी होती. या अश्वारुढ पुतळ्याचे भूमिपूजन शिवराज्याभिषेक दिनी संपन्न झाले. ही वास्तू स्वाभिमानाची साक्ष देईल असा विश्वास आमदार राणाजगजितसिंह पद्मसिंह पाटील यांनी व्यक्त केलाय.

या संबंधी राणाजगजितसिंह म्हणाले की, ‘महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या पावन नगरीला साजेसा असा छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा असावा अशी आपल्या सर्वांचीच इच्छा होती. अनेक दिवसापासून यासाठी पाठपुरावाही करत होतो. अखेर यास यश मिळाले आहे. त्या सोबतच चौक सुशोभीकरणाचे कामही सुरू होईल. तुळजापूरकरांसाठी ही मोठी अभिमानाची बाब आहे.’

शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून या छत्रपती शिवरायांच्या आश्वारूढ पुतळ्यासाठीचे भूमिपूजन करण्यात आले. लवकरच काम पूर्ण होऊन इतिहासाची आणि स्वाभिमानाची साक्ष देणारी वास्तू उभी राहिल. असा विश्वास आमदार पाटील यांनी व्यक्त केलाय. या बरोबरच सुशोभीकरणाचे कामही सोबतच केले जाणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!