Share

कामगाराच्या आत्महत्या प्रकारातून उद्योजकाला मारहाण

Published On: 

औरंंगाबाद : कंपनीतील कामगाराने खासगी वादातून हँड वॉश पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. या घटनेची माहिती मिळताच मेव्हण्यासह कंपनीत दाखल झालेल्या टोळक्याने उद्योजकासह अधिका-याला कार्यालयात शिरुन बेदम मारहाण केल्याची घटना रविवारी (दि.८) सकाळी दहाच्या सुमारास रेल्वे स्टेशन एमआयडीसी परिसरात घडली. याप्रकरणी सातारा पोलिसांनी सचिन शिंगाडे, शुध्दोधन मोरे आणि किरण जाधव अटक केली आहे. तर मारहाण करणारा मुख्य सूत्रधार पसार झाला आहे.

रेल्वे स्टेशन एमआयडीसीत असलेल्या ऑटोमोटिव्ह प्रा. लिमीटेड कंपनीत सचिन उत्तमराव गायकवाड हा कामाला आहे. कंपनीत त्याचा वाद झाला होता. त्यातून त्याने आज सकाळी हँड वॉश पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. या घटनेची माहिती कंपनीतील सुरक्षा रक्षक संदीप एकनाथ देवळाणकर यांनी अधिकारी भुषण विलास व्यहाळकर (वय ३४, रा. पहाडसिंगपुरा) यांना दिली.

तसेच गायकवाड यांना सातारा परिसरातील कमलनयन बजाज रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे व्यहाळकर यांनी कंपनीत धाव घेतली. तेव्हा कंपनीत आलेल्या सचिन डुमणे त्याचे साथीदार सचिन मधुकर शिंगाडे, शुध्दोधन कचरु मोरे, किरण रमेश जाधव व त्याच्या आठ ते दहा साथीदारांनी कंपनीत शिरुन सुरक्षा रक्षक देवळाणकर यांना मारहाण केली. तसेच कंपनीचे मालक नित्यानंद भोगले व प्लान्ट हेड मिलींद सोनगिरकर यांना बेदम मारहाण केली.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!