Share

कम्युनिस्ट चळवळीचा बुलंद आवाज शांत झाला, कॉम्रेड सुंदर नवलकर यांचं निधन

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : ज्येष्ठ सीपीआय नेत्या कॉम्रेड सुंदर नवलकर यांचं आज वृद्धापकाळाने निधन झालं. त्या 100 वर्षांच्या होत्या. कम्युनिस्ट चळवळीच्या अत्यंत कर्मठ, लढाऊ नेत्या अशी त्यांची ओळख होती. त्यांनी महाराष्ट्रात सीपीआयएमएल संघटनेची स्थापना केली. ट्रेड युनियनच्या कार्यकर्त्यांमधे, कामगारांमध्ये त्यांचं नाव अत्यंत लोकप्रिय होतं. विविध कम्युनिस्ट नेत्यांचं साहित्य हिंदी आणि मराठीतून निर्माण करण्याचं काम त्यांनी केलं. अनेक विदेशी कम्युनिस्ट नेत्यांचं साहित्यही त्यांनी मराठी आणि हिंदीत भाषांतर केलं. त्यांनी अमेरिकन भांडवलशाही विरोधात आवाज उठवला होता. तसंच मुंबईत तरुण मुलांसाठी स्टडी सर्कल आणि बौद्धिक वर्ग चालवत होत्या.

काँम्रेड सुंदर नवलकर या कडव्या डाव्या नेत्या ओळखल्या जात. कॉम्रेड नवलकर या भारतीय कम्युनिस्ट क्रांतिकारक चळवळीतील एक ठळक खूण असल्याचे मानले जाते. त्यांनी आपले समर्पण, विचार आणि लढाऊ वृत्तीच्या जोरावर हजारो कामगारांचे संघटन केले होते. त्यांच्या कार्याचा प्रभाव १९७४ सालच्या ऐतिहासिक रेल्वे संपात देखील उमटला होता. तसेच दलित पँथरमध्ये देखील त्याच्या कार्याचा प्रभाव दिसून आला.

सन १९७० च्या उत्तरार्धात त्यांनी भारतीय कम्युनिस्ट पक्षात (मार्क्सवादी-लेनिनवादी) उजव्या किंवा नवसंशोधनवादी विचारसरणी रुजवण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. डिसेंबर १९७८ मध्ये सीपीआय (एमएल) ची मध्यवर्ती टीम तयार करणार्या प्रमुख शिल्पकार ठरल्या होत्या.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!