मुंबई : यावर्षी होणाऱ्या टी-२० विश्वचषकापूर्वी इंग्लंडचा संघ पाकिस्तानला (ENG vs PAK) भेट देणार आहे. इंग्लंडचा संघ पाकिस्तानमध्ये सात टी-२० सामन्यांची मालिका खेळणार आहे. गेल्या वर्षी इंग्लंडने पाकिस्तान दौऱ्याला नकार दिला होता. त्यानंतर यावर्षी सप्टेंबरमध्ये इंग्लंड आणि पाकिस्तानमध्ये क्रिकेट मालिका होऊ शकते.
पाकिस्तानी प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, दोन्ही देश १५ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत सात टी-२० सामने खेळणार आहेत. हे सामने मुलतान, रावळपिंडी आणि लाहोर येथे खेळले जाण्याची शक्यता आहे. मात्र, या मालिकेचे वेळापत्रक अद्याप समोर आलेले नाही. विशेष म्हणजे, इंग्लंड आणि पाकिस्तान हे मूलत: पाच सामन्यांच्या मालिकेत खेळणार होते. इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने नंतर दोन अतिरिक्त टी-२० सामन्यांना मान्यता दिली.
गेल्या वर्षी इंग्लंड क्रिकेट बोर्डाने बबलच्या थकव्याचे कारण देत पाकिस्तान दौरा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर पीसीबीने आक्षेप नोंदवला होता आणि दोन्ही मंडळांमध्ये नाराजीही दिसून आली होती. ईसीबीने नंतर या वर्षी दौरा करण्याचे मान्य केले. इऑन मॉर्गनच्या नेतृत्वाखालील इंग्लिश संघ सध्या नेदरलँड्सविरुद्ध खेळला. दुसरीकडे इंग्लंडचा कसोटी संघ सध्या न्यूझीलंडविरुद्ध मायदेशात कसोटी मालिका खेळत आहे. इंग्लंड संघाने दोन सामने जिंकले आहेत. त्यानंतर इंग्लिश संघ भारतीय संघाचे यजमानपद भूषवणार आहे. टीम इंडिया गतवर्षीची उरलेली एक कसोटी खेळणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

