मुंबई : इंदोरहून पुण्याला येणारी एसटी महामंडळाची बस नर्मदा नदीत कोसळल्याने अपघात झाला असून आतापर्यंत १३ जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे सर्वच स्तरांतून हळहळ व्यक्त केली जात आहे. अपघातात मरण पावलेल्या प्रवाशांच्या नातेवाईकांना महामंडळातर्फे प्रत्येकी दहा लाख रुपये देण्याची कार्यवाही लगेच करावी, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एसटी महामंडळाला दिले आहेत. तसेच या घटनेच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांच्याशी संवाद साधला आहे. त्याचबरोबर जखमींना आवश्यक ती मदत करून, बचावकार्यात देखील मदत करावी, अशी विनंती त्यांनी धार जिल्हा प्रशासनाला केली आहे.
हा अपघात खलघाट येथील संजय सेतू येथे झाला. मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी या घटनेला दुजोरा दिला. या घटनेनंतर विभागीय आयुक्त डॉ. पवनकुमार शर्मा यांनी दोन्ही जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना घटनास्थळी पोहोचण्याचे निर्देश दिले. या बसमध्ये इंदौर आणि पुण्याचे प्रवासी असल्याचे सांगण्यात येत आहे. आतापर्यंत घटनास्थळावरून १५ जणांना वाचवण्यात यश आले असल्याची माहिती मिळत आहे. तर बचाव कार्य अजूनही सुरूच असून मृत्यू झालेल्यांची संख्या आणखी वाढणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या दरम्यान धार जिल्हा प्रशासनाशी समन्वय साधून जखमींना तात्काळ उपचार द्यावेत, असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. तसेच मुख्यमंत्री स्वतः मदत कार्यावर लक्ष ठेऊन आहेत.
महत्वाच्या बातम्या:
- Eknath Shinde : इंदौरहून जळगावला येणाऱ्या बसचा अपघात; मुख्यमंत्री शिंदेंकडून १० लाखांच्या मदतीची घोषणा
- IND vs ENG : ऋषभ पंतच्या धडाकेबाज कामगिरीमागे ‘हा’ खेळाडू, ट्विटने केला खुलासा; वाचा!
- Bus accident in Indore : इंदौरहून जळगावला येणारी बस नर्मदा नदीत कोसळल्याने १३ जणांचा मृत्यू
- Manmohan singh | मनमोहन सिंग यांना पाहून नेटकरी भावुक; मतदानासाठी आले व्हीलचेअरवरुन
- Sanjay Raut : “सिढिया चढते हुए जो उतरना भूल जाते है…”, संजय राऊतांचे ट्वीट चर्चेत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

