🕒 1 min read
पटना- बिहारमध्ये विधानसभा निवडणुकांच्या पहिल्या टप्प्यासाठी आज मतदान होत आहे .निवडणूक सुरळीतपणे आणि भयमुक्त वातावरणात पार पाडाव्यात यासाठी संपूर्ण राज्यात कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे, या पहिल्या टप्प्यात १६ जिल्ह्यांमधील ७१ मतदारसंघात मतदान होणार असून दोन कोटी १४ लाख मतदार निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या एक हजार 66 उमेदवारांचं भवितव्य निश्चित करतील. सकाळी सात वाजता मतदान सुरू होणार असून ते संध्याकाळी सहापर्यंत चालेल.
मतदान होत असलेल्या ७१ मतदार संघांपैकी 35 मतदारसंघ नक्षलग्रस्त भगत आहेत. चैनपूर, नबीनगर, कुटुंबां आणि रफिगंज या नक्षलवादी भागात असलेल्या चार मतदारसंघांमध्ये मतदानाची वेळ दुपारी तीनपर्यंत ठेवण्यात आली असून आणखी पाच नक्षलग्रस्त मतदारसंघांमध्ये संध्याकाळी पाच वाजेपर्यंत मतदान होईल. उर्वरित 26 नक्षलग्रस्त मतदारसंघात मतदानाची वेळ दुपारी चार वाजेपर्यंत ठेवण्यात आली आहे.
दरम्यान, बिहारमध्ये आगामी विधानसभा निवडणुकांच्या प्रचाराला वेग आला असून आता खऱ्या अर्थानं रणधुमाळी रंगायला लागली आहे. विविध पक्षांचे स्टार प्रचारक आणि ज्येष्ठ नेते प्रचारसभांसाठी बिहारमध्ये तळ ठोकून आहेत. दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकांसाठी ३ नोव्हेंबरला तर तिसऱ्या टप्प्यातील निवडणुकांसाठी ७ नोव्हेंबरला मतदान होणार आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री आणि जदयूचे अध्यक्ष नितीशकुमार यांच्यावर परत एकदा लोक जनशक्ती पार्टीचे अध्यक्ष चिराग पासवान यांनी टीका करत भाजपाला नितीशकुमार हे पुन्हा धोका देतील, असे भाकीत वर्तविले आहे.नितीशकुमार निवडणुकीच्या निकालानंतर भाजपाला धोका देतील आणि राजदसोबत जातील, असे वक्तव्य चिराग पासवान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आजच्या बिहार दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर केले आहे.
दरम्यान, नितीशकुमार यांच्या जदयूने सन २०१५ मध्ये बिहारच्या निवडणुकीत लालू प्रसाद यादव यांच्या राजदसोबत निवडणूक लढवली होती. राजद यामध्ये सर्वात मोठा पक्ष ठरला होता. दोघांच्या युतीमुळे नितीशकुमार पुन्हा एकदा मुख्यमंत्री बनले होते.
महत्वाच्या बातम्या
- 370 कलम हटवल्यावर नक्की बदलले काय? संजय राऊत यांचा हल्लाबोल
- मराठा समाजाच्या उद्रेकाची सरकार वाट पाहतेय कि काय?
- मराठा आरक्षण : सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीबाबत अनेक गैरसमज निर्माण केले गेले-चव्हाण
- बिहारमध्ये विधानसभा निवडणुक : पहिल्या टप्प्यासाठी आज मतदान, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला
- जळगावात भाजपची तातडीची बैठक, रक्षा खडसेंची दांडी…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
