Share

बिहारमध्ये विधानसभा निवडणुक : पहिल्या टप्प्यासाठी आज मतदान, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

Published On: 

पटना- बिहारमध्ये विधानसभा निवडणुकांच्या पहिल्या टप्प्यासाठी आज मतदान होत आहे .निवडणूक सुरळीतपणे आणि भयमुक्त वातावरणात पार पाडाव्यात यासाठी संपूर्ण राज्यात कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे, या पहिल्या टप्प्यात १६ जिल्ह्यांमधील ७१ मतदारसंघात मतदान होणार असून दोन कोटी १४ लाख मतदार निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या एक हजार 66 उमेदवारांचं भवितव्य निश्चित करतील. सकाळी सात वाजता मतदान सुरू झाले असून ते संध्याकाळी सहापर्यंत चालेल.

मतदान होत असलेल्या ७१ मतदार संघांपैकी 35 मतदारसंघ नक्षलग्रस्त भगत आहेत. चैनपूर, नबीनगर, कुटुंबां आणि रफिगंज या नक्षलवादी भागात असलेल्या चार मतदारसंघांमध्ये मतदानाची वेळ दुपारी तीनपर्यंत ठेवण्यात आली असून आणखी पाच नक्षलग्रस्त मतदारसंघांमध्ये संध्याकाळी पाच वाजेपर्यंत मतदान होईल. उर्वरित 26 नक्षलग्रस्त मतदारसंघात मतदानाची वेळ दुपारी चार वाजेपर्यंत ठेवण्यात आली आहे.

दरम्यान, बिहारमध्ये आगामी विधानसभा निवडणुकांच्या प्रचाराला वेग आला असून आता खऱ्या अर्थानं रणधुमाळी रंगायला लागली आहे. विविध पक्षांचे स्टार प्रचारक आणि ज्येष्ठ नेते प्रचारसभांसाठी बिहारमध्ये तळ ठोकून आहेत.

दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकांसाठी ३ नोव्हेंबरला तर तिसऱ्या टप्प्यातील निवडणुकांसाठी ७ नोव्हेंबरला मतदान होणार आहे. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नद्डा यांची आज राजनगरमध्ये प्रचारसभा झाली. राजद बिहारमध्ये रोजगार निर्मितीच्या प्रश्नावर जनतेच्या डोळ्यात धूळफेक करीत आहे, असा आरोप त्यांनी केला.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!