मुंबई : TV रिऍलिटी शो ‘बिग बॉस’ सर्वात लोकप्रिय ‘शो’ आहे. ‘बिग बॉस’शो ची चाहते नेहमीच वाट बगत असतात. ‘शो’चे होस्ट अभिनेता सलमान यांचा ‘शो’होस्ट करायचा अंदाज चाहत्यांना अजूनच ‘शो’कडे आकर्षित करते. सध्या ‘बिग बॉस १४ चे पर्व जोशात चालू आहे.
यात रोज काहीना काही नवे वाद विवाद उभे राहत आहेत. स्पर्धकांची आपापसांत रोजची भांडणे सुरू आहेत. नेहमी प्रमाणे ‘शो’मध्ये आता प्रेमाचा त्रिकोण देखील दिसत आहे. यातच गायक राहुल वैद्य, जान कुमार सानू आणि निक्की तंबोली यांच्यात आपापसांत जोरदार वाद सुरू आहेत.
या वादादरम्यान जान कुमार सानूने मराठी गायक राहुल वैद्य याच्यावर शाब्दिक हल्लाबोल चालू असताना ‘मराठी’ भाषेबद्दल अपमानकारक शब्द उच्चारले. खेळादरम्यान झालेल्या वादात जान कुमार सानूने निक्की तंबोलीशी बोलताना मराठी भाषेची चीड येत असल्याचे म्हटले आहे.
‘बिग बॉस’च्या घरात मराठमोळा गायक राहुल वैद्य स्पर्धक म्हणून सामील झाला आहे. या कार्यक्रमात जान कुमार सानू आणि निक्की तंबोली यांच्या दरम्यान घनिष्ठ मैत्री दाखवण्यात आली होती. काही कारणाने या दोघांमध्ये बिनसल्याने निक्कीने जानची साथ सोडली, आणि राहुल वैद्यचा हात धरला आहे.
दरम्यान निक्की राहुल सोबत मराठीत सवांद साधत होती व त्यावेळेस निक्कीने जानशी देखील मराठीत बोलण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी जानने तिला, ‘माझ्याशी मराठीत बोलायचा प्रयत्न करू नको. बोलायचे असल्यास हिंदीत बोल’, असे म्हंटले. तसेच, मला मराठी ऐकून चीड येते, असे तो म्हणाला.
जान सानूच्या वक्तव्यावर मराठी माणसांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. तर सलमान खान यावर शनिवारी काय प्रतिक्रिया देणार याकडे सगळ्यांचे लक्ष आहे. महाराष्ट्रात राहून देखील प्रसिद्ध गायक कुमार सानूच्या मुलाने असे बोलणे कितपत योग्य आहे असा सवाल चाहत्यांनी उभा केला आहे. या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर जोरदार आक्रोश पाहायला मिळत आहे.
महत्वाच्या बातम्या
- आयकर विभागाची दिल्ली,एनसीआर, हरियाणा, पंजाब, उत्तराखंडमध्ये मोठी कारवाई
- ‘आता यांच्या पोरांचे लग्न देखील आपल्याच पैशातून होतील’’, नितेश राणेंचा घणाघात
- ‘केवळ मराठा समाज नाही तर संपूर्ण महाराष्ट्र वेठीला धरला गेला आहे’
- अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यासाठी मराठा आंदोलक आक्रमक
- देशी गर्ल चा विदेशी चित्रपट ‘टेक्स्ट फॉर यू’ लवकरच
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

