औरंगाबाद : प्रगती कॉलनी घाटी रोड येथील सार्वजनिक रस्त्यावर १० बाय १० चे शेड उभारुन त्यालगत सुमारे १० बाय ५० चौरस फूट खुल्या जागेवर मातीचा ओटा करुन जागा अडविण्यात आली होती त्यामुळे अडथळा निर्माण होत होता .सदर जागेवरील अतिक्रमण निष्काशित करण्यात आले.
प्रशासक यांच्याकडे सदर अतिक्रमण काढण्याबाबत लेखी तक्रार अर्ज प्राप्त झाला होता. त्या अनुषंगाने अतिरीक्त आयुक्त रविंद निकम अतिक्रमण विभागातील समन्वयक तथा पदनिर्देशित अधिकारी सविता सोनवणे यांनी नोव्हेंबर -२०२० मध्ये स्थळ पाहणी करुन कार्यवाही करण्याबाबत सुचना दिल्या होत्या. वरिष्ठांच्या आदेशानुसार या भागात स्थळपाहणी करुन नागरीकांशी चर्चा करुन रस्त्याबाबत शहानिशा करण्यात आली. जागेचा पंचनामा करुन रस्त्यावाबत सहाय्य्क संचालक नगररचना विभागाचा अभिप्राय घेण्यात आला.
न्यायालयाच्या आदेशानुसार व पीआर कार्डवर शासकीय जागेची नोंदबाबत खात्री झाल्याने सदर ठिकाणी असलेले पत्र्याचे शेड व ओटा तोडण्यात आला. याठिकाणी त्वरीत रस्ता करावा म्हुणन नागरीकांनी मागणी केली आहे. सदरील कार्यवाही प्रशासक आस्तिक कुमार पांडेय यांच्या आदेशान्वये अतिरीक्त आयुक्त-२ रविंद्र निकम यांच्या मार्गदर्शनाखाली पदनिर्देशित अधिकारी, वसंत भोये, आर.एस.राचतवार, इमारत निरीक्षक, पी.बी.गवळी, सय्यद जमशीद, मो.मजहर अली अतिक्रमण हटाव पोलीस कर्मचारी राजपूत शेख, अमीन ठाकरे, पठाण व अतिक्रमण हटाव पथकाने कार्यवाही पार पाडली.
महत्वाच्या बातम्या

