🕒 1 min read
पुणे : देशातील सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांनी कोरोना व्हायरससंदर्भात लसीकरणासाठी तयार राहावं, अशी सूचना केंद्र सरकारने केली आहे.2 जानेवारीला देशातील सगळी राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये लसीकरणाची रंगीत तालीम म्हणजेच ‘ड्राय रन’ घेतली जाईल, असं केंद्र सरकारने म्हटलं आहे.
या सर्व हालचालींवरून लवकरच भारतात लसीला परवानगी मिळणार हे स्पष्ट झालं होतं. केंद्र सरकारने सर्व आरोग्य विभागासह राज्य सरकारनं देखील लसीकरणासाठी सज्ज व्हावं असं सांगितलं होतं. २०२० हे वर्ष संकटांचं ठरल्यानंतर २०२१ या वर्षाच्या पहिल्याच दिवशी देशवासीयांसाठी आता खुशखबर मिळत आहे.
केंद्र सरकारने सीरम इंस्टिट्यूटच्या लसीला परवानगी दिली आहे. वॅक्सिन एक्सपर्ट पॅनेलने ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाला (डीसीजीआय) मान्यता देण्याची शिफारस केली आहे. त्यामुळे, देशात पहिली परवानगी मिळालेली लस हि या सिरम संस्थेची ठरली आहे. ऑक्सफर्ड आणि ऍस्ट्रोजेनिकाच्या संयुक्त विद्यमाने सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ‘कोविशिल्ड’ लस उत्पादन करते. या कोरोनावरील लसीला मान्यता मिळाली आहे. कोव्हिशिल्ड लसीच्या आपत्कालीन वापराला मंजुरी मिळाली आहे. अभिमानाची बाब म्हणजे या लसीचं उत्पादन पुण्यातल्या सीरम इन्स्टिट्युटमध्ये सुरु आहे.
‘कोव्हिशिल्ड’ या कोरोना लसीनं तिन्ही टप्प्यातील चाचण्या पूर्ण केल्या आहे. चाचण्यांदरम्यान ही लस 90 टक्क्यांपर्यंत यशस्वी ठरली होती. मात्र, महिनाभराच्या अंतरानं या लसीचे 2-3 डोस घेतल्यास ही 95 टक्क्यांपर्यंत यशस्वी ठरते, असं सीरम इन्स्टिट्युटचे सीईओ अदर पुनावालांनी स्पष्ट केलं होतं. यासह भारतीय वातावरणात वापरासाठी अधिक अनुकूल ठरल्यानं या लसीला प्राधान्याने आपत्कालीन वापरासाठी मंजुरी देण्यात आहे.
महत्वाच्या बातम्या
- शिवसेनेचा मुख्यमंत्री असुनही औरंगाबाद शहराचे नाव संभाजीनगर का होत नाही : मनसे
- ‘अजितदादा, आपण जनतेसाठी जे काम करायचं ते करायचंच’
- ‘व्होडाफोन आयडिया’ 3G सेवा वापरणाऱ्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी…
- सभागृहात पवार-फडणवीस एकाच मंचावर, तर बाहेर दोन्ही पक्षांच्या समर्थकांची हुल्लडबाजी
- मुख्यमंत्री महोदय, सरकार इतके निर्दयी कसे काय झाले ? नववर्षानिमित्त पोस्टरमधून मनसेचा सवाल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
