🕒 1 min read
नवी दिल्ली: मोबाईल नेटवर्क त्यानंतर इंटरनेट यांनी जगाला एक ग्लोबल व्हिलेज बनवलं सुरूवातीला टूजी थ्रीजी फोरजी आणि त्यानंतर आता येऊ घातलेला फाईव जी यामुळे ग्राहकांना आता आणखी जलद गतीने इंटरनेटचा ॲक्सेस उपलब्ध होणार आहे. तर नुकतच रिलायन्स जिओने अमेरिकन टेक्नॉलॉजी फर्म क्वालकॉमबरोबर भारतात 5G नेटवर्कची यशस्वी चाचणी केल्याने भारतात लवकरच 5G नेटवर्क मिळण्याची शक्यता निर्माण झाल्याचे सांगण्यात आले होते.
त्यांनतर आता काही काहीदिवसांपूर्वीच व्होडाफोन आयडिया हे एकत्र येत व्हीआय (VI) झाले आहेत. त्यांनतर आता कंपनी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी लागोपाठ नवनवीन ऑफर्स आणत आहे. तर कंपनी कडून आता 3G सेवा लवकरच बंद करण्याचा निर्णय घेण्यात येत आहे. यामध्ये दिल्ली विभागातील ग्राहकाच्या सध्याच्या सीम न 4G मध्ये अपग्रेड करण्यात येणार आहे.
स्पेक्ट्रम री-फार्मिंगच्या अंतर्गत ऑपरेटर 4G सेवांसाठी 3G स्पेक्ट्रम वापरत असेल तर त्यांना आपले सीम 4G मध्ये अपग्रेड करावे लागणार आहे. याआधी हि प्रक्रिया बेंगलुरु आणि मुंबई या शहरांमध्ये सुरू झाली आहे. या साठी कंपनीने ग्राहकांना या संदर्भात SMS पाठवणे सुरु केले आहे.
यामध्ये ग्राहकांना आपले जुने सीम १५ जानेवारीच्या आत अपग्रेड करावे लागणार आहेत. कारण त्यांनतर कंपनी नेटवर्क फक्त 4G मध्ये आणणार आहे. तर जवळच्या व्हिआय स्टोर वर हे सीम मोफत अपग्रेड करून देण्यात येणर आहेत. तर व्हाईस कॉलिंग साठी 2G सेवा सुरु ठेवण्यात येणार आहे. तर जुन्या सीम मध्ये डेटा सर्विसेज ऐक्सेस मिळणार नाहीय. त्यामुळे दिल्ली तील ग्र्हकानी लवकर आपल्के सीम अपग्रेड करून घ्यावेत
महत्वाच्या बातम्या
- देशातील शेतकरी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मागे ठामपणे उभे आहेत : शिवराज सिंह चौहान
- भारताने शेवग्याच्या पावडरीची जागतिक मागणी लक्षात घेऊन त्याच्या निर्यातीचा केला आरंभ
- भारताचे दिग्गज हॉकीपटू मायकल किंडो यांनी घेतला अखेरचा श्वास
- साईनगरीत भाविकांकडून बाबांचे दर्शन घेऊन नव्या वर्षाचे स्वागत
- सामनात ‘ठाकरे ब्रँड’ला साजेशी भाषाच वापरली जाते; शिवसेनेचं भाजपला प्रत्युत्तर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
