🕒 1 min read
पुणे : पुणे शहराच्या पूर्व भागातील सुमारे १५ लाख लोकांना सुरळीत पाणीपुरवठा होण्यासाठी पुणे महापालिकेच्या ‘भामा-आसखेड पाणीपुरवठा प्रकल्पा’चा १ जानेवारी २०२१ रोजी ऑनलाईन लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला होता. हा कार्यक्रम नुकताच पार पडला आहे.
महापालिकेच्या नवीन इमारतीतील श्री छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात दुपारी चार वाजता या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यास राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस , भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, खासदार गिरीश बापट आदी नेते व इतर नगरसेवक उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस एकाच मंचावर येणार असल्याने या कार्यक्रमाकडे राज्याचे लक्ष लागले होते.पहाटेच्या शपथविधी नंतर अजितदादा आणि फडणवीस एकाच मंचावर येणार असल्याने पुणेकरांना यानिमित्त अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांची राजकीय टोलेबाजी पाहायला मिळेल अशा चर्चा गेले काही दिवस चालू होत्या.
दरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी, ‘सर्वांनी एकत्रित येऊन लोककल्याणाची कामे करायची असतात. आज या पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून पुणेकरांचा एक मोठा प्रश्न मार्गी लागतो आहे. अजितदादा, तुम्ही आणि मी एकत्र येणार म्हणल्यावर या भेटीच्या आधी २ दिवस आणि नंतर २ दिवस माध्यमांमध्ये बातम्या पसरतात. इतकंच नाही एखादा लोकप्रतिनिधी कामासाठी दुसऱ्या पक्षातील नेत्याला वा मंत्र्याला भेटायला गेला तरी त्याच्या पक्षबदलाच्या चर्चा रंगतात. हे सर्व चालायचंच मात्र जनतेसाठी आपण जे काम करायचं ते करायचंच’ असं देखील ते म्हणाले.
तर दुसरीकडं, या सभागृहाबाहेर दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते हे आमने-सामने आल्याचं दिसून आलं. यावेळी दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी महापालिकेतच मोठा जमाव करून घोषणाबाजी सुरु केली. प्रमुख नेते पुढील कार्यक्रमासाठी बाहेर पडले. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी अजित पवार यांच्या नावाने तर भाजपच्या कार्यकर्त्यांनी गिरीश बापट यांच्या नावाच्या घोषणा दिल्या. वर्षाच्या पहिल्याच दिवशी या कार्यकर्त्यांनी धक्काबुक्की देखील केली. त्यामुळे महापालिकेतच असं वर्तन हे चुकीचं असून कोरोनाच्या सर्वच नियमांना हरताळ फासल्याचं देखील दिसून आलं.
महत्वाच्या बातम्या
- शिवसेनेचा मुख्यमंत्री असुनही औरंगाबाद शहराचे नाव संभाजीनगर का होत नाही : मनसे
- महत्वाची बातमी : लस आली रे! भारतात पहिल्या लसीला परवानगी
- ‘व्होडाफोन आयडिया’ 3G सेवा वापरणाऱ्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी…
- साईनगरीत भाविकांकडून बाबांचे दर्शन घेऊन नव्या वर्षाचे स्वागत
- केंद्राने राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना कोविड-19 लस वितरणासाठी सज्ज रहाण्यास सांगितले
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
