🕒 1 min read
नायगाव : अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना केलेली तुटपुंजी मदत आणि केंद्र सरकारने सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याचे विरोधात घेतलेल्या निर्णयाची होळी करून सरकारच्या विरोधात रयत क्रांती संघटनेकडून आंदोलन करण्यात येणार आहे. रयत क्रांती संघटनेचे संस्थापक आमदार सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली येत्या २० ऑक्टोबर रोजी शेतकऱ्यांच्या हक्कासाठी सरकारच्या विरोधात आंदोलन संपूर्ण राज्यात बुधवार रोजी होणार आहे. नायगाव येथे रयत क्रांती संघटनेच्या वतीने सकाळी ११ वाजता तहसील कार्यालय समोर हे आंदोलन होणार आहे. या आंदोलनात तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवून आपला दबावगट तयार करावा असे आवाहन रयत क्रांती संघटनेचे युवा प्रदेशाध्यक्ष पांडुरंग शिंदे यांनी कोलंबी येथे उपस्थित शेतकरी संवाद मेळाव्यात म्हटले आहे.
पांडुरंग शिंदे म्हणाले की, २०१९ मध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये पूरग्रस्त भागाला सरकारने ज्या पद्धतीने मदत केली त्या पद्धतीने मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांना सुद्धा मदत करावी, जिल्ह्यात पिक विमा शंभर टक्के लागू करावा ,नद्या-नाल्यांना खरडून गेलेल्या जमिनीला विशेष मदत दयावी अशा अनेक मागण्या आम्ही आत्तापर्यंत सरकार दरबारी मांडल्या पण महाविकास आघाडी सरकार शेतकऱ्याकडे लक्ष देत नाही
याविरोधात एल्गार शेतकर्यांच्या वतीने पुकारलेला आहे ,दुसरीकडे केंद्र सरकारने खाद्यतेलाचे भाव कमी करण्यासाठी सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे विरोधात निर्णय घेतल्यामुळे बाजारातल्या सोयाबीनचे दर कमी झालेले आहे अशा दोन्ही सरकारच्या विरोधात शेतकरी पुत्राच्या वतीने हे आंदोलन होणार आहे .आपल्या बापाच्या हक्काच्या लढाईसाठी जात, धर्म, पक्ष, बाजूला ठेवून आपण या आंदोलनात जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे ही विनंती करून आवाहन केले.
आज कोलंबी, दरेगाव, गोदमगाव, अंचोली, नरंगल, बेंद्री, लालवंडी या गावात भेट देऊन जनजागृती रयत क्रांती संघटनेच्यावतीने करण्यात आली. आंदोलन जनजागृतीसाठी शेतकऱ्याचा प्रत्येक गावात उस्फूर्त प्रतिसाद होता. यावेळी रयत क्रांती संघटनेचे तालुका अध्यक्ष शहाजी कदम, युवा तालुकाध्यक्ष साहेबराव चट्टे, शरद शिंदे शिवाजी गायकवाड ओम प्रकाश शिंदे गणेश शिंदे आणि कोलंबी गावातील दादाराव शिंदे, बाबाराव शिंदे, प्रल्हाद बैस, प्रवीण बैस, विजय बैस, शेतकरी, युवा मित्र इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.
महत्वाच्या बातम्या
- केरळमध्ये अतिवृष्टीमुळे दरडी कोसळून झालेल्या दुर्घटनांमध्ये 23 जणांचा मृत्यु ;13 जण बेपत्ता
- ‘ठाकरे-पवार सरकार म्हणजे ‘अलीबाबा चाळीस चोरा’चे घोटाळेबाज सरकार’, किरीट सोमय्यांचे टीकास्त्र
- ‘केंद्रीय यंत्रणा योग्य मार्गावर असल्यानेच चुकवलेले पैसे जमा करावे लागले’
- केरळ पाठोपाठ आणखी एका राज्यात मुसळधार पावसाचा इशारा
- अंमली पदार्थ विरोधी कारवाईत अडथळे आणण्याचे राष्ट्रवादीचे प्रयत्न – केशव उपाध्ये
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

