🕒 1 min read
नवी दिल्ली:- केंद्र सरकारने लागू केलेल्या नव्या कृषी कायद्यांच्या विरोधात पंजाब आणि हरियाणातील शेतकरी राजधानी दिल्लीत गेल्या दिड महिन्यांपासून आंदोलन करत आहेत. दरम्यान शनिवारी (9 जानेवारी) दिल्ली-हरियाणा सिंघू सीमेवर पंजाबमधील 40 वर्षीय शेतकऱ्याने विष प्राशन करुन आत्महत्या केली आहे.
शेतकरी आंदोलनावर तोडगा काढण्यात केंद्र सरकारला अपयश आलं आहे. उलट शेतकऱ्यांना सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा सल्ला केंद्र सरकारने दिला आहे. त्याचा निषेध म्हणून येत्या 15 जानेवारी रोजी शेतकरी अधिकार दिनाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस देशभरातील राजभवनांना घेराव घालणार आहे. काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला यांनी काल पत्रकार परिषदेत या आंदोलनाची घोषणा केली.
दरम्यान, केंद्र सरकार आणि शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींदरम्यान शुक्रवारी (8 जानेवारी) झालेली आठवी बैठकही निष्फळ ठरली आहे. या बैठकीनंतर तिन्ही कृषी कायदे रद्द होणार नाहीत. त्या व्यतिरिक्त इतर पर्याय असतील तर द्या, त्यावर विचार करू, असं केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी सांगितलं आहे. त्यामुळे शेतकरी आंदोलनाचा तिढा अद्यापही सुटताना दिसत नाही.
महत्वाच्या बातम्या
- देवेंद्र फडणवीस, राज ठाकरे, चंद्रकांतदादांच्या सुरक्षेत कपात; ठाकरे सरकारचा निर्णय
- अनेकदा ऑस्ट्रेलिया चाहत्यांकडून रंगावरून टिप्पणी होते; वर्णद्वेषीच्या टीकेवरून क्रिकेटपटू भडकले
- आजारी कर्मचाऱ्याला भेटण्यासाठी रतन टाटा मुंबईहून पुण्यात पोहोचले, पण…
- #भंडारा जिल्हा रूग्णालयातील हलगर्जीपणाची चौकशी करुन दोषींवर तात्काळ कारवाई करा- दरेकर
- भंडारा घटनेतील सुरक्षित स्थळी हलविण्यात आलेल्या बालकांमध्ये जुळ्यांचाही समावेश
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
