ऑस्ट्रेलिया : भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसऱ्या कसोटीच्या चौथ्या दिवशी प्रेक्षकांनी असभ्य वर्तनाचे पुन्हा दर्शन घडवले. सीमारेषेवर क्षेत्ररक्षण करणाऱ्या मोहम्मद सिराजला वर्णद्वेषी टीकेचा सामना करावा लागला आणि त्यानं थेट पंचांकडे तक्रार केली. यावेळी कर्णधार अजिंक्य रहाणेनंही आक्रमक पवित्रा घेताना कारवाईची मागणी केली. त्यामुळे लगेच पोलिसांना बोलावण्यात आले आणि सहा प्रेक्षकांना चौकशीसाठी ताब्यात घेतले गेले. क्रिकेट ऑस्ट्रेलियानंही प्रसिद्धी पत्रक काढून घडलेल्या प्रकाराबद्दल टीम इंडियाची माफी मागितली. भारताचा फिरकीपटू हरभजन सिंग यानं त्याचा अनुभव सांगताला ऑस्ट्रेलियात अनेकदा धर्म व रंगांवरून टीका केली गेल्याचे सांगितले. दरम्यान, आजच्या घटनेचा अनेक क्रिकेटपटूनी निषेध केला.
”सिडनी कसोटीत काही चाहत्यांकडून असभ्य वर्तन करण्यात आल्याचे पाहुन वाईट वाटले. त्यांच्यामुळे खेळाला गालबोट लागले,”असे वीरेंद्र सेहवागनं ट्विट केलं.
Tum karo toh Sarcasm , aur koi Kare toh Racism .
Very unfortunate with what some of the Australian crowd has been doing at the SCG and spoiling the vibes of a good test series. pic.twitter.com/mrDTbX4t7i— Virender Sehwag (@virendersehwag) January 10, 2021
”सिडनीत जे घडलं, ते दुर्दैवी होतं. अशा वागणुकीता थारा द्यायला नको. खेळाडूंवर वर्णद्वेषी टीका का केली जाते, हेच समजत नाही. तुम्हाला खेळाडूंचा आदर करायचा नसेल, तर नका येऊ आणि येथील वातावरण नका बिघडवू,”असे ट्विट व्ही व्ही एस लक्ष्मणने केलं.”
Very unfortunate to see what’s happening at SCG. There is no place for this rubbish. Never understood the need to yell abuse at players on a sporting field.. If you’re not here to watch the game and can’t be respectful, then pls don’t come and spoil the atmosphere. #AUSvIND
— VVS Laxman (@VVSLaxman281) January 10, 2021
ऑस्ट्रेलियात खेळताना मी अनेकदा माझ्या धर्म आणि रंगावरून बरंच काही ऐकलं आहे. चाहत्यांकडून प्रथमच असं घडत नाही, त्यांना कसं रोखावं?,”ऑस्ट्रेलियात खेळताना मी अनेकदा माझ्या धर्म आणि रंगावरून बरंच काही ऐकलं आहे. चाहत्यांकडून प्रथमच असं घडत नाही, त्यांना कसं रोखावं?,”असा सवाल हरभजन सिंगनं केला.
I personally have heard many things on the field while playing in Australia about Me My religion My colour and much more..This isn’t the first time the crowd is doing this nonsense..How do u stop them ?? #AUSvIND
— Harbhajan Turbanator (@harbhajan_singh) January 10, 2021
दरम्यान, क्रिकेट ऑस्ट्रेलियानंही टीम इंडियाची माफी मागितली. त्यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले की,’अशा प्रकारची वागणूक खपवून घेतली जाणार नाही. दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद याचा तपास करत आहे आणि दोषी प्रेक्षकाची ओखळ पटल्यानंतर त्याच्यावर कारवाई करण्यात येईल. त्याच्यावर आजीवन बंदी घातली जाईल. CCTV फुटेजची पाहणी केली जात आहे.”
महत्वाच्या बातम्या
- ‘बर्ड फ्लू रोगाबाबत शास्त्रीय माहितीचा आधार नसलेले गैरसमज व अफवा पसरवू नका’
- धनंजय मुंडेंनी पक्षश्रेष्ठींना सादर केला एक वर्षाच्या कामकाजाचा आढावा
- आजारी कर्मचाऱ्याला भेटण्यासाठी रतन टाटा मुंबईहून पुण्यात पोहोचले, पण…
- औरंगाबादेत ‘मास्क’ न वापरणाऱ्यांनी भरला ’70’ लाखांचा दंड
- भंडारा घटनेतील सुरक्षित स्थळी हलविण्यात आलेल्या बालकांमध्ये जुळ्यांचाही समावेश
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

