🕒 1 min read
मुंबई: माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सुरक्षेत मोठी कपात करण्यात आली आहे. राज्य सरकारने नुकताच हा निर्णय घेतला आहे. फडणवीसांच्या सुरक्षा ताफ्यात देण्यात आलेली बुलेटप्रुफ गाडीसुद्धा काढून घेण्यात येणार आहे.
विशेष म्हणजे मुंबई पोलिसांनी फडणवीस यांच्या जिवाला धोका असल्याचा अहवाल यापूर्वीच दिला होता. त्यानंतरसुद्धा त्यांच्या सुरक्षेत कपात करण्यात आली आहे. दोन दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीत ठाकरे सरकारने हा निर्णय घेतला आहे.
दरम्यान, मनसेप्रमुख राज ठाकरे यांना झेड श्रेणीची सुरक्षा आहे. त्याऐवजी आता वाय प्लस सुरक्षा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महाविकास आघाडी सरकारने विरोधी पक्षातील नेत्यांची सुरक्षा कपात केली नसून काँग्रेसचे नेते आणि मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख, संजय बनसोडे यांच्या सुरक्षेत देखील कपात केली आहे. त्याचबरोबर काँग्रेसचे माजी मुंबई शहर अध्यक्ष कृपाशंकर सिंह यांच्या सुद्धा सुरक्षा काढून घेण्यात आली आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘बर्ड फ्लू रोगाबाबत शास्त्रीय माहितीचा आधार नसलेले गैरसमज व अफवा पसरवू नका’
- अनेकदा ऑस्ट्रेलिया चाहत्यांकडून रंगावरून टिप्पणी होते; वर्णद्वेषीच्या टीकेवरून क्रिकेटपटू भडकले
- आजारी कर्मचाऱ्याला भेटण्यासाठी रतन टाटा मुंबईहून पुण्यात पोहोचले, पण…
- #भंडारा जिल्हा रूग्णालयातील हलगर्जीपणाची चौकशी करुन दोषींवर तात्काळ कारवाई करा- दरेकर
- भंडारा घटनेतील सुरक्षित स्थळी हलविण्यात आलेल्या बालकांमध्ये जुळ्यांचाही समावेश
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
