नवी मुंबई –महाराष्ट्रातील भंडारा जिल्हा रुग्णालयात शुक्रवारी रात्री उशिरा नवजात बालकांच्या दक्षता विभागाला लागलेल्या आगीत होरपळून १० बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
नवजात बालकांचं वय एक महिने ते तीन महिन्यांचं होतं, अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे. वार्डमध्ये एकूण १७ बालकं होती त्यातील सात बालकांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आलं. परंतु, १० बालकांचे प्राण मात्र वाचवले जाऊ शकले नाहीत. या दुर्दैवी घटनेमुळे अवघा देश हादरला आहे. या घटनेवर विविध स्तरातून प्रतिक्रिया येत असून दोषी असणाऱ्या व्यक्तींना कठोर शिक्षा दिली जावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
भंडारा जिल्हा शासकीय रुग्णालयातील आजची घटना अत्यंत दुर्दैवी, क्लेशदायक असून सरकारने यांची गंभीर दखल घेऊन या प्रकरणाची तात्काळ चौकशी करण्यात यावी तसेच या प्रकारणी हलगर्जीपणा दाखविलेल्या व्यवस्थापनाची चौकशी करून संबंधित दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केली आहे.
भंडारा जिल्हा शासकीय रुग्णालयात शॉर्टसर्किटमुळे आग लागून दहा नवजात बालकांचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत दु:खदायक आणि व्यथित करणारी आहे. या दुदैर्वी घटनेच्या निमित्तने ग्रामीण रूग्णांलयांमधील व्यवस्थेचा ढोबळ कारभार समोर आला आहे. ग्रामीण भागातील रूग्णांलयामधील सध्याची कमतरता व तेथील दोष यानिमित्ताने सुधारण्याची नितांत आवश्यकता आहे. अन्यथा या अश्या ढोबळ व्यवस्थेमुळे निष्पापांना नाहक मुत्युला सामोरे जावे लागेल अशी खंतही दरेकर यांनी व्यक्त केली.
महत्वाच्या बातम्या
- ‘बर्ड फ्लू रोगाबाबत शास्त्रीय माहितीचा आधार नसलेले गैरसमज व अफवा पसरवू नका’
- धनंजय मुंडेंनी पक्षश्रेष्ठींना सादर केला एक वर्षाच्या कामकाजाचा आढावा
- आजारी कर्मचाऱ्याला भेटण्यासाठी रतन टाटा मुंबईहून पुण्यात पोहोचले, पण…
- औरंगाबादेत ‘मास्क’ न वापरणाऱ्यांनी भरला ’70’ लाखांचा दंड
- भंडारा घटनेतील सुरक्षित स्थळी हलविण्यात आलेल्या बालकांमध्ये जुळ्यांचाही समावेश
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
