Share

अंबानींच्या ड्रीम प्रोजेक्टसाठी आता महाराष्ट्रातून हत्तीही गुजरातला हलविणार; वन्यप्रेमींचा तीव्र विरोध

Published On: 

🕒 1 min read

नागपूर : गुजरातच्या जामनगर भागात मुकेश अंबानी(Mukesh Ambani) यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीजच्या माध्यमातून सुमारे २५० एकर जागेत खासगी प्राणिसंग्रहालय उभारण्यात येत असून या प्राणिसंग्रहालयात देशभरातील दुर्मिळ प्राणी नेण्यात येणार आहे. याच पार्श्वभूमीवर आता अंबानींच्या या ड्रीम प्रोजेक्टसाठी महाराष्ट्रातून हत्ती गुजरातमध्ये पाठविण्याची प्रक्रिया सुरू असल्याची बाब समोर आली असून वन्यप्रेमींकडून यासाठी तीव्र विरोध दर्शविण्यात येत आहे.

गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा वनविभाग अंतर्गत येत असलेल्या कमलापूर वनपरिक्षेत्रातील शासकीय हत्ती कॅम्प हे महाराष्ट्रातील एकमेव हत्तीकॅम्प असून या कॅम्पमध्ये सध्या सात हत्ती असून, त्यापैकी चार तसेच आलापल्ली येथील तीन असे एकूण सात हत्ती गुजरातला पाठविण्यात येणार आहेत. त्यामुळे आता वन्यजीवप्रेमींनी हत्ती बाहेर पाठवण्यास विरोध केला आहे.

दरम्यान, मागील दोन वर्षांमध्ये हत्तीची तीन पिल्ले मृत पावली असून सातपैकी चार हत्ती आणि आलापल्ली येथील तीनपैकी तीनही हत्ती स्थलांतरित करण्यात येत असल्याने वन्यजीवप्रेमींसह सर्वच आक्रमक झाल्याचे बघायला मिळत आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!