🕒 1 min read
मुंबई: राज्य निवडणूक आयोगाने ९२ नगर परिषद व ४ नगर पंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय होणे म्हणजे बहुसंख्य ओबीसी समाजावर घोर अन्याय आहे म्हणून आरक्षणाशिवाय निवडणुका होऊ नयेत यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ठाम असल्याचे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil ) यांनी म्हटले आहे.
ओबीसी समाजाला आरक्षण मिळावे यासाठी महाविकास आघाडी सर्वोतोपरीने प्रयत्न करत आहे. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ पहिल्या दिवसापासून स्वतः यात जातीने लक्ष घालत आहेत. महाविकास आघाडी सरकारने नेमलेल्या बांटिया आयोगाने इम्पिरेकल डेटा गोळा करून अहवालही तयार केला आहे. अशी माहिती जयंत पाटील यांनी ट्वीट करत दिली आहे.
राज्य निवडणूक आयोगाने ९२ नगर परिषद व ४ नगर पंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय होणे म्हणजे बहुसंख्य ओबीसी समाजावर घोर अन्याय आहे म्हणून आरक्षणाशिवाय निवडणुका होऊ नयेत यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ठाम आहे.@NCPspeaks
— Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) July 9, 2022
तसेच महाविकास आघाडीने केलेल्या प्रयत्नांना नक्कीच यश मिळेल व ओबीसी समाजाला आरक्षण मिळेल याबाबत मला पूर्ण विश्वास आहे. ही लढाई अंतिम टप्प्यात असताना निवडणूक घेण्याचा अट्टाहास करू नये अशी आमची विनंती आहे. अशी मागणी जयंत पाटील यांनी केली आहे.
महत्वाच्या बातम्या:
- Sanjay Raut : “गुलाबरावांचा जुलाबराव होणार…”, संजय राऊतांची फटकेबाजी
- Sanjay Raut | “आपले अस्तित्व वाचवण्यासाठी शिंदे गटाचे आमदार…” ; संजय राऊतांचा हल्लाबोल
- Shahaji Bapu : “काय झाडी, काय हाटील..”, फेम शहाजी बापू यांचा कार्यकर्त्याने घेतला थेट ‘मुका’; PHOTO व्हायरल
- Deepali Syyed | “शिंदे गटातील प्रवक्ते व आमदारांची उद्धव साहेबांशी चर्चा करण्याची विनंती” ; दिपाली सय्यद यांचे ट्विट
- Alia Bhatt : नीतू कपूर यांच्या वाढदिवसानिमित्त सून आलियाने दिली ‘ही’ खास भेटवस्तू
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
