Share

‘ओबीसींना २७ टक्के आरक्षण देणं शक्य तिथे निवडणुका घ्या, अन्यथा…’; दरेकरांनी मांडली भूमिका

Published On: 

🕒 1 min read

मुंबई :  स्थानिक संस्थामधील ओबीसी आरक्षण रद्द करण्याचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर राज्यभरात आंदोलनं केली जात आहेत. यातून मार्ग काढण्यासाठी राज्य सरकार विरोधी पक्षांना सोबत घेऊन प्रयत्न करत आहे. महाविकास आघाडी सरकारने दाखल केलेली पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे.

मराठा आरक्षणासाठी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतल्यानंतर आता ओबीसी आरक्षणाचा मार्ग मोकळा करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात सर्वपक्षीय नेत्यांची बैठक पार पडली आहे. ‘ज्या ठिकाणी ओबीसींना 27 टक्के आरक्षण देणं शक्य आहे, तिथे निवडणूक झाली पाहिजे. अन्यथा निवडणुका पुढे ढकलाव्यात हाच पर्याय आहे,’ अशी भूमिका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केली आहे.

सर्वपक्षीय बैठकीत नेमकी काय चर्चा ?

ओबीसी आरक्षणाशिवाय राज्यात कोणत्याही निवडणुका होऊ देणार नाही, असं म्हणत ओबीसी नेत्यांनी तीव्र विरोध केला होता. यासाठी मेळावे देखील घेण्यात आले. दरम्यान, आज मुख्यमंत्री ठाकरेंसोबत झालेल्या बैठकीत सर्व पक्षांमधील राज्यातील वरिष्ठ नेते उपस्थित होते. यावेळी त्यांनी ओबीसी आरक्षणाशिवाय कोणत्याच निवडणुका घेऊ नयेत अशी भूमिका मांडली असून आता राज्य सरकार काय निर्णय घेणार हे महत्वाचं ठरणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!