Share

निवडणुकांमुळे व्याजदराचा निर्णय रद्द कि तात्पुरता स्थगीत केला? :चव्हाणांचा संतप्त सवाल

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : गेल्या वर्षभरापासून राज्यासह देशातील जनतेवर कोरोना महामारी मुळे उद्भवलेल्या परिस्थिती मध्ये लॉकडाऊन करण्यात आल्याने अनेकांच्या हाताचा रोजगार गेला. तर मध्यमवर्गीयांवर महागाई आणि आर्थिक कपातीची कुऱ्हाड पडली असताना त्यात नुकताच अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी लघु बचत योजनेवरील व्याज दर कमी करण्याचा निर्णय घेतल्याने संकट उभे राहिले होते.

मात्र त्यांनतर केंद्र सरकारने हा निर्णय मागे घेतला आहे. सीतारमण यांनी ट्विट करुन ही माहिती दिली आहे. या ट्विटनंतर कोट्यावधी लोकांनी सुटकेचा श्वास सोडला आहे. त्यामुळे आता भारत सरकारच्या लहान बचत योजनांचे व्याज दर २०२०-२०२१ च्या शेवटच्या तिमाहीत उपस्थित असलेल्या दरावर राहतील.

यावर स्पष्टीकरण देताना अर्थमंत्र्यांनी नजर चुकीने हा आदेश देण्यात आल्याचे सांगितलं आहे. परंतु या निर्णयावर आता कॉंग्रेसचे नेते व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी हल्लाबोल केला आहे. ‘देशातील कोट्यवधी सामान्य जनतेवर गंभीर परिणाम करणारा निर्णय ‘अनावधानाने किंवा नजरचुकीने’ कसा काय होऊ शकतो? किंवा पाच राज्यातील विधानसभा निवडणुका लक्षात घेता केंद्राने हा निर्णय रद्द केला किंवा ‘तात्पुरता’ स्थगीत ठेवला आहे? अर्थातच देशाच्या नाजूक आर्थिक परिस्थितीत वित्तमंत्र्यांचा हा कटू आर्थिक निर्णय राजकीय पातळीवर किंवा पंतप्रधानाच्या स्तरावर तातडीने बदलला गेला हे स्पष्ट आहे,’ असा हल्लाबोल माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!