मुंबई: कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे महाराष्ट्र विधानसभा आणि विधानपरिषदेचे कामकाज सहा महिने बंद होते. आज विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. विधानपरिषदेच्या उपसभापती निलम गोर्हे यांची मुदत संपल्याने हे पद रिक्त झाले होते. आता यासाठी उद्या निवडणूक होणार आहे, तशी घोषणा विधानपरिषदचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी केली आहे.
सध्या महाविकासआघाडीतील आमदारांची संख्या बघता पुन्हा निलम गोर्हेंना पुन्हा संधी मिळू शकते असं चित्र आहे. दरम्यान, विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाचा आजचा पहिलाच दिवस हा वादळी ठरला आहे. ग्राम पंचायतीमध्ये प्रशासक नेमणूक करण्यात आली होती. त्याबद्दल सुधारणा विधेयक मांडण्यात आले.
कंगनाला केंद्राकडून वाय दर्जाची सुरक्षा , मानले अमित शहांचे आभार
भाजपने या विधेयकावर जोरदार आक्षेप घेतला. ग्रामपंचायत सुधारणा विधेयकाला विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आक्षेप घेतला. ग्रामपंचायत प्रशासक नेमणुकीबाबत उच्च न्यायालयाने निर्णय दिला असताना पुन्हा हे विधेयक का? जो वाद न्यायालयात आहे त्यावर अध्यादेश काढायची घाई का? असा सवाल उपस्थितीत केला होता.
माढा तालुक्यातील टेंभुर्णी येथे ५० खाटांचे सुसज्ज उपजिल्हा रुग्णालय करा – बबनराव शिंदे
तर ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी फडणवीस यांचा दावा खोडून काढला. तुमची माहिती अपूर्ण आहे. 5 वर्ष सरपंच कसा यावा, याबाबत नियम आहे. पण 5 वर्षांनंतर काय करावं याबाबत कायदा नाही, असं हसन मुश्रीफ यांनी सांगितले. परंतु, विरोधकांनी जोरदार गोंधळ करत सभात्याग केले.
महाविकास आघाडी सरकार म्हणजे इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी – राधाकृष्ण विखे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
