मुंबई : अभेनेत्री कंगना रणौतने मुंबईबद्दल केलेल्या विधानामुळे शिवसेना आणि कंगणामध्ये राजकीय संघर्ष पाहायला मिळत आहे. कंगनाने ट्विटवर मी ९ सेप्टेंबरला येत आहे काय करायचं ते करा असे विधान केले होते. यावरून कंगनाला धमक्याही आल्या होत्या. त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव कंगनाला केंद्र सरकारकडून वाय दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे.
केंद्राकडून सुरक्षा दिल्यानंतर कंगनाने देखील ट्वीट करत अमित शाह यांचे आभार मानले आहेत. ती म्हणाली, ‘आता कोणत्याही देशभक्ताचा आवाज दाबला जाणार नाही हे यावरुन सिद्ध होतंय. मी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे आभार मानते. त्यांना वाटलं असतं तर ते मला काही दिवसांनंतर मुंबईत जाण्याचा सल्ला देऊ शकले असते. मात्र, त्यांनी भारताच्या या मुलीचा मान राखला आहे. त्यांनी माझ्या स्वाभिमान आणि आत्मसन्मानाची रक्षा केली आहे. जय हिंद.’
पितराचे जेवण भोवले; १८ जणांना कोरोनाची लागण !
ये प्रमाण है की अब किसी देशभक्त आवाज़ को कोई फ़ासीवादी नहीं कुचल सकेगा,मैं @AmitShah जी की आभारी हूँ वो चाहते तो हालातों के चलते मुझे कुछ दिन बाद मुंबई जाने की सलाह देते मगर उन्होंने भारत की एक बेटी के वचनों का मान रखा, हमारे स्वाभिमान और आत्मसम्मान की लाज रखी, जय हिंद ???? https://t.co/VSbZMG66LT
— Kangana Ranaut (@KanganaTeam) September 7, 2020
दरम्यान कंगनाने मुंबईची तुलना पाक व्याप्त काश्मीरशी केल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. यावरून शिवसेना खासदार संजय राऊत आणि कंगना मध्ये ट्विटर चांगलाच कलगीतुरा रंगला आहे. तसेच कंगनाविरोधात सगळ्या पक्षांनी एकत्र येण्याचे आवाहनही शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातून करण्यात आले आहे.


