Share

महाविकास आघाडी सरकार म्हणजे इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी – राधाकृष्ण विखे

Published On: 

अहमदनगर/ऋषिकेश घोगरे:– महाविकास आघाडी सरकारमधील तीन पक्षांत असलेली अस्वस्थता बाहेर येऊ नये म्हणूनच सरकारने दोन दिवसांच्या अधिवेशनाचा घाट घातला आहे. सरकार नावाची कोणतीच व्यवस्था राज्यात नाही. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार म्हणजे फक्त इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी असल्याची टीका आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली. अधिवेशनाला रवाना होण्यापूर्वी ते माध्यमांशी बोलत होते.

आ.विखे म्हणाले की, कोरोना सारख्या महामारीच्या काळात सरकार फक्त अधिकाऱ्यांच्या भरवशावर आहे. जम्बो हॉस्पिटलच्या घोषणा केल्या परंतु प्रत्यक्षात कोणत्याही सुविधा कोविड रुग्णालयांत नाहीत. कोरोनाच्या काळात सामान्य माणसांचे प्रचंड हाल होत आहे.

माजी खासदार राजू शेट्टी यांना कोरोनाची लागण

तसेच शिर्डी येथील साईबाबा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांबाबत आ.विखे म्हणाले, जिवावर उदार होऊन रात्रंदिवस नर्सिंग स्टाफ काम करीत आहे. त्यांना कोणतेही संरक्षण नाही. उलट त्यांच्या वेतनात कपात करण्याचे निर्णय होतात, हे व्यवस्थेचे दुर्दैव आहे असे विखे म्हणाले.

पितराचे जेवण भोवले; १८ जणांना कोरोनाची लागण !

अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाची स्थिती गंभीर आहे. जिल्ह्यात तीन मंत्री असताना देखील एकानेही कोविड रुग्णालय उभारण्यासाठी पुढाकार घेतला नाही. अधिवेशनाचा कालावधी कमी असला तरी विविध प्रश्नांसंदर्भात पाठपुरावा करणार असल्याचे आ.विखे यांनी सांगितले.

दाऊदच्या बायको माझे संबंध असल्याचे आरोप करणाऱ्या हँकरला भेटले होते फडणवीस:एकनाथ खडसे

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!