Share

माढा तालुक्यातील टेंभुर्णी येथे ५० खाटांचे सुसज्ज उपजिल्हा रुग्णालय करा – बबनराव शिंदे

Published On: 

🕒 1 min read

सोलापूर : माढा तालुक्यातील टेंभुर्णी येथे ५० खाटांचे सुसज्ज उपजिल्हा रुग्णालय करण्यात यावी अशी मागणी माढा विधानसभा मतदार संघाचे आमदार बबन शिंदे यांनी केली आहे. या संदर्भात प्रशासकीय मंजुरी देऊन या परिसरातील आरोग्याचा प्रश्न सोडवावा अशा आशयाचे निवेदन त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थ व नियोजन मंत्री अजित पवार यांना दिले आहे.

सोलापूर- पुणे राष्ट्रीय महामार्गावरील c हे महत्वाचे व मध्यवर्ती गाव असून गावची लोकसंख्या सुमारे वीस हजार हजारांपेक्षा जास्त आहे. तसेच पंढरपूर -अहमदनगर- शिर्डी येथे जाणाऱ्या येणाऱ्या भावीकांची मोठ्या प्रमाणावर संख्या आहे. टेंभुर्णी येथे एम.आय.डी.सी विकसित झालेली असून परिसरात ४० ते ५० गावे आहेत. सध्या या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र कार्यरत आहे.

महाविकास आघाडी सरकार म्हणजे इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी – राधाकृष्ण विखे

राष्ट्रीय महामार्गावरील अपघातग्रस्तांना व परिसरातील रुग्णांना वेळेत उपचार मिळावेत म्हणून सदर ठिकाणी उपजिल्हा रुग्णालय होणेची मागणी येथील जि.प. सदस्य प्रतिनिधी शिवाजीराव पाटील, माजी जि.प. सदस्य संजय पाटील भिमानगरकर, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुका अध्यक्ष रमेश पाटील, विठ्ठलराव शिंदे कारखान्याचे संचालक बबनबापू पाटील, पं. स. सदस्य प्रज्ञा कुटे, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे तालुका अध्यक्ष रावसाहेब देशमुख,सरपंच प्रमोद कुटे, टेंभुर्णी येथील बशीर जहागीरदार यांचेसह सर्व स्तरातील नागरिकांकडून होत आहे.

माजी खासदार राजू शेट्टी यांना कोरोनाची लागण

या बाबत आ. बबनराव शिंदे यांनी फेब्रुवारी महिन्यामध्ये राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली होती. यावेळी प्रस्तावातील त्रुटी पूर्ण करून फेर प्रस्ताव शासनाकडे सादर करावा अशा सूचना त्यावेळी संबंधित आरोग्य विभागाच्या अधिकऱ्यांना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार प्रस्ताव आरोग्य विभागाने शासनाकडे सादर देखील केलेला आहे.

पितराचे जेवण भोवले; १८ जणांना कोरोनाची लागण !

टेंभुर्णी मध्ये उपजिल्हा रुग्णालय व्हावे यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक कार्यकर्ते बशीर जहागिरदार हे आंदोलनाच्या माध्यमातून लढा देत आहेत. टेंभुर्णी उपजिल्हा रुग्णालयाचा पहिला प्रस्ताव २९ जून २०१८ रोजी उपसंचालक आरोग्य विभाग, पुणे यांनी सादर केला होता. तर दुसरा प्रस्ताव ८ फेब्रुवारी २०१९ रोजी संपूर्ण सर्व्हे अहवाल बजेट सहीत प्रधान सचिव, मंत्रालय मुंबई यांच्याकडे सादर करण्यात आला आहे.

दाऊदच्या बायको माझे संबंध असल्याचे आरोप करणाऱ्या हँकरला भेटले होते फडणवीस:एकनाथ खडसे

अहवालामध्ये कोणत्याही प्रकारच्या त्रुटी नाहीत शिवाय या विषयी आरोग्य विभागाने त्रुटी संदर्भात कोणताही पत्रव्यवहार जागीरदार यांच्याशी केला नसल्याचे त्यांनी महाराष्ट्र देशा शी बोलताना सांगितले. श्रेयवादासाठी जाणुन बुजून त्रुटी निर्माण केल्या जात असल्याचा आरोप करून शासनाने टेंभुर्णी उपजिल्हा रुग्णालयाची संपूर्ण मंजुरी दिल्या शिवाय माझे आंदोलन थांबणार नसल्याचा इशारा देखील त्यांनी दिला. येत्या २ ऑक्टोबर रोजी गांधी जयंती दिनी ते टेंभुर्णी ते मुंबई मंत्रालय उपजिल्हा रुग्णालय मंजुरी साठी पदयात्रा काढणार आहेत.

टेंभुर्णी उपजिल्हा रुग्णालयाला प्रशासकीय मान्यता देण्यासाठी माझा शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. आरोग्य विभागाकडून सर्व बाबींची पूर्तता करून सध्या याबाबतचा प्रस्ताव वित्त व नियोजन विभागाकडे पाठविण्यात आलेला आहे. मात्र सध्याची निर्माण झालेल्या कोरोना परिस्थितीमुळे नवीन प्रकल्पासाठी मंजुरी व निधी देण्याकरिता शासनाने स्थगिती दिलेली आहे. मात्र माढा तालुक्यामध्ये उपजिल्हा रुग्णालय नाही.

टेंभुर्णी गावची लोकसंख्या वीस हजाराच्या वर असून त्याठिकाणी ५० खाटांचे उपजिल्हा रुग्णालयासाठी मंजुरी देऊन निधी उपलब्ध करुन देण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचेशी सकारात्मक चर्चा झालेली आहे. असे आमदार बबनराव शिंदे यांनी सांगितले.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!