टीम महाराष्ट्र देशा : राज्यातील विधानसभा निवडणुकींच्या तारखा लवकरच जाहीर होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी आज केंद्रीय निवडणूक आयुक्त आणि इतर दोन वरिष्ठ अधिकारी मुंबईत दाखल झाले आहेत. तर गुरवारी निवडणुकांच्या तारखा जाहीर होणार असल्याचं सांगितल जात आहे. तर उद्या केंद्रीय निवडणूक आयुक्त पत्रकार परिषद घेणार आहेत.
मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांच्या अध्यक्षतेखालील त्रिसदस्यीय पथक राज्यातील निवडणुकीच्या तयारीची पाहणी करण्यासाठी राज्यात आलं आहे. निवडणुका जाहीर करण्यापूर्वी हे पथक दोन दिवस राज्य सरकार, महाराष्ट्र पोलिस, रेल्वे, आयकर विभाग, उत्पादन शुल्क आणि इतर विभागांमधील अधिकाऱ्यांची भेट घेईल. तसंच हे त्रिसदस्यीय पथक विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, राजकीय पक्षांचे नेते यांच्यासोबतही बैठक घेणार आहेत.
सूत्रांच्या माहितीनुसार महाराष्ट्रातील निवडणूक दोन टप्प्यात पार पडू शकते. तर यंदा झारखंडमध्ये वेगळा पॅटर्न पाहायला मिळू शकतो. 2014 मध्ये इथे पाच टप्प्यात मतदान झालं होतं. यंदा महाराष्ट्रासह हरियाणा, झारखंडमध्येही विधानसभा निवडणूक पार पडणार आहेत.त्यामुळे तिनही राज्याच्या विधानसभेवर कोणाची सत्ता येणार याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. दिवाळीच्या आधीचं निवडणुक प्रक्रिया पूर्ण होणार असल्याच सांगितल जात आहे.
- ‘कविता करणारे मंत्री होऊ शकतात तर बाबासाहेबांचे वंशज मुख्यमंत्री का होऊ शकत नाहीत’
- राष्ट्रवादीचे नेते भाजपात पाठवणे ही शरद पवारांचीचं खेळी, वंचित नेत्याचा गंभीर आरोप
- बाजार समिती गैव्यवहारप्रकरणी दिलीप सोपलांना उच्च न्यायालयाचा दिलासा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

