टीम महाराष्ट्र देशा : राजस्थानमधील वडमेर येथील सभेतील “भारताकडे असलेले अणुबॉम्ब दिवाळीमध्ये वापरण्यासाठी ठेवलेले नाहीत”. या विधानासाठी निवडणूक आयोगाने पंतप्रधान नरेंद्र मोदींना क्लीन चिट दिली आहे. दरम्यान, मोदींच्या या वक्तव्यावर आक्षेप घेत काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली होती. परंतु मोदींचे हे वक्तव्य आदर्श आचासंहितेचे उल्लंघन नसल्याचे सांगत निवडणूक आयोगाने ही क्लीन चीट दिली आहे.
नरेंद्र मोदींनी निवडणूक प्रचारादरम्यान केलेल्या विविध विधानांवरुन काँग्रेसने मोदींविरोधात एकूण 11 तक्रारी दाखल केल्या आहेत. त्यापैकी 3 तक्रारींचा निकाल निवडणूक आयोगाने दिला आहे. तीनही वेळा निवडणूक आयोगाने मोदींना क्लीन चिट दिलेली आहे.


