मुंबई : काल शिवसेनेचे दोन दसरा मेळावे पार पडले. एकनाथ शिंदे यांनी बिकेसी मैदानावर मेळावा घेतला तर उद्धव ठाकरे यांनी शिवारी पार्कवर आपली सभा घेतली. दोन्ही गटाने एकमेकांवर जोरदार टीका केली. यावेळी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर घणाघात केला. त्यांनी एकनाथ शिंदे यांचे नातू रुद्रांश श्रीकांत शिंदे यांचा देखील उल्लेख भाषणात केला. त्यामुळे विरोधकांनी हा मुद्दा चांगलाच उचलून धरला आहे. तसेच यावरून नवा राजकीय वाद सुरु झाला आहे. या वादात आता शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी उडी घेतली आहे. तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार टीका केली आहे.
काय म्हणाले रामदास कदम ?
रामदास कदम यांनी माध्यमांशी बोलताना उद्धव ठाकरेंवर टीका करत रुद्रांश श्रीकांत शिंदेचं भविष्यही सांगितलं आहे. एकनाथ शिंदेंच्या नातवाला नगरसेवक व्हायलाच आणखी 25 वर्षे लागतील. पण भविष्य कुणी पाहिलेलं नाही. तो भविष्यात मुख्यमंत्रीही होऊ शकतो, असं रामदास कदम म्हणालेत. एकनाथ शिंदे यांच्यावर तुमचा राग आहे, ठीक आहे. पण त्यांचा नातू फक्त दीड वर्षांचा आहे. तुम्ही दीड वर्षाच्या मुलावर पण बोलत आहात?, असं म्हणत कदम यांनी आपली खंत बोलून दाखवली.
काय म्हणाले देवेंद्र फडणवीस ?
देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांनी केलेल्या वक्तव्याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. उद्धव ठाकरेंसारख्या नेत्याने एकनाथ शिंदेंच्या नातवाचा उल्लेख करुन टिप्पणी करणे अतिशय खालच्या दर्जाचं असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. उद्धव ठाकरेंनी आपले शब्द परत घेतले पाहिजे. एकनाथ शिंदे यांच्याशी तुमचं पटत नाही, पण काही पथ्य पाळली पाहिजेत. तसेच, नातू नगरसेवकपदावर डोळा लावून बसला आहे. एवढा दीड वर्षांचा बच्चू आहे, रुद्रांश. त्याचा जन्म झाला आणि तुमचं अध:पतन सुरू झालं. तुम्ही मुख्यमंत्री झालात, तुमचा मुलगा मंत्री झाला, आम्ही काही बोललो का?, असा सवाल कर देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर चांगलाच पलटवार केला आहे.
उद्धव ठाकरे काय म्हणाले होते?
दरम्यान, काय कमी दिलं त्यांना? बाप मंत्री आता तर मुख्यमंत्री आहे, कार्टं खासदार. पुन्हा डोळे लावून बसले आहेत, नातू नगरसेवक. अरे त्याला मोठं तर होऊ दे, शाळेत जाऊ दे. आताच नगरसेवक?, असं वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात भाषण करताना केलं होतं.
महत्वाच्या बातम्या :
- Devendra Fadanvis | उद्धव ठाकरेंनी आपले शब्द मागे घ्यावेत, जाहीर माफी मागावी-देवेंद्र फडणवीस
- Travel Guide | ‘हे’ 5 हिंदी भाषिक देश फिरण्यासाठी ठरतील सर्वोत्तम ठिकाणं
- Narayan Rane । उद्धव ठाकरे यांचा शिवाजी पार्कवरील मेळावा म्हणजे तमाशाकारांचा मेळावा; नारायण राणेंचा घणाघात
- Eknath Shinde : एकनाथ शिंदे यांचा पक्षप्रमुखाबरोबरच पक्षाध्यक्षाचाही दावा
- Narayan Rane । “उद्धव ठाकरे लबाड लांडगा आहे, त्यानं…”; नारायण राणेंची जीभ घसरली


